Monalisa Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

Kumbh Mela girl Monalisa Bhosle Marriage : महाकुंभ मेळ्यामुळे व्हायरल झालेली मोनालिसा लग्न बंधनात अडकली आहे. तिने मुस्लीम बॉयफ्रेंडशी पळून जाऊन लग्न केले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

महाकुंभ मेळ्यामुळे प्रसिद्ध झालेली मोनालिसाने लग्न केले आहे.

मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत पळून जाऊन मोनालिसाने लग्नगाठ बांधली.

मोनालिसाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

महाकुंभ मेळ्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली मोनालिसा (Monalisa Bhosle) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र आता मोनालिसा भोसले पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. मोनालिसा भोसलेने मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत पळून जाऊन लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. कुंभमेळ्यात मोनालिसा रूद्राक्ष माळा विकायची.

मोनालिसाने आंतरधर्मीय लग्न केले आहे. मोनालिसाने तिचा बॉयफ्रेंड फरमान खानसोबत लग्न केले आहे. दोघांनी केरळमध्ये लग्नगाठ बांधली. मोनालिसा मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची आहे. तर फरमान खान मूळचा महाराष्ट्रातील आहे. तसेच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. मोनालिसाच्या लग्नाला तिच्या कुटुंबाचा विरोध होता, त्यामुळे मोनालिसा आणि फरमानने घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न केले. मोनालिसा आणि फरमानने आधी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील अरुमानूर नैनार मंदिरात लग्न केले.

व्हायरल व्हिडीओत फरमान मोनालिसाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात कोर्टातून मिळालेले लग्नाचे प्रमाणपत्र देखील दिसत आहे. 11 मार्चला दोघं विवाह बंधनात अडकले. कुटुंबामुळे मोनालिसाने पोलीसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

मोनालिसा-फरमान लव्ह स्टोरी

मीडिया रिपोर्टनुसार, मोनालिसा आणि फरमान यांची ओळख दीड वर्षापूर्वी फेसबुकवर झाली. ती दोघे बोलू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. दोघेही वेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांच्या नात्याला कुटुंबाने विरोध केला. तसेच मोनालिसाच्या वडीलांनी तिच्यावर त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्यासाठी दबाव टाकला.

महाकुंभ मेळ्यात मोनालिसाने आपल्या डोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लवकरच ती लवकरच 'नागम्मा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते तिच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तसेच चाहते तिच्या लग्नसाठी तिला आणि फरमानला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

शनिवार ठरला घातवार, नाशिकनंतर धुळ्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट

IPL अर्ध्यावर सोडून कर्णधार अचानक मायदेशी परतला, सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका

Gold Earrings Designs: डेली वेअरसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT