सुप्रसिद्ध कुमार रामसे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन  Saam Tv
मनोरंजन बातम्या

सुप्रसिद्ध कुमार रामसे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

रामसे ब्रदर्स निर्मित भयानक कथेत असणाऱ्या चित्रपटांमधील पटकथा लिहिणारे प्रख्यात चित्रपट निर्माते कुमार रामसे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : रामसे ब्रदर्स निर्मित भयानक कथेत असणाऱ्या चित्रपटांमधील पटकथा लिहिणारे प्रख्यात चित्रपट निर्माते कुमार रामसे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. Kumar Ramsey dies heart attack

कुमार रामसे हे ८५ वर्षांचे होते. कुमार यांचा थोरला मुलगा गोपाळ यांनी पीटीआयला या संदर्भात माहिती दिली आहे, या माहिती मध्ये त्यांनी सांगितले की, कुमार रामसे हे मुंबईतील हिरानंदानी या ठिकाणच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आहे. कुमार यांच्या पश्चात पत्नी शीला व ३ मुले राज, गोपाळ आणि सुनील असा परिवार आहे.

हे देखील पहा-

याबद्दल माहिती देताना गोपाळ रामसे म्हणाले आहे की, पहाटे ५:३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते आम्हा सर्वांना सोडून निघून गेले आहेत. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहे. आम्ही सध्या पुजारी येण्याची वाट बघत आहे. कुमार रामसे हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचा सुपुत्र आहे. कुमार आपल्या ७ भावांमध्ये सर्वात मोठे होते. रामसे बंधू मधील केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू व अर्जुन यांचा समाव होता. ७० व ८० च्या दशकामध्ये ते कमी बजेटचे कल्ट चित्रपट बनवत असत. Kumar Ramsey dies heart attack

पुराना मंदिर १९८४, साया आणि खोज १९८९ यासह रामसे ब्रदर्सच्या बहुतेक चित्रपटांकरिता स्क्रिप्ट लिहिण्यात कुमार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. साया मध्ये मुख्य भूमिका शत्रुघ्न सिन्हानी साकारली आहे, व १९८९ ची सुपरहिट फिल्म खोज मधील अभिनेते ऋषी कपूर व नसीरुद्दीन शाह यांच्यामध्ये मुख्य भूमिका होती. १९७९ च्या और कौन व १९८७ मधील दहशत या चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: बिहारमध्ये भाजप प्रणित NDA ला यश, महाराष्ट्रातील नागपुरात जल्लोष

Diabetes Patients Breakfast: डायबेटीजच्या रूग्णांनी नाश्ता कधी करावा? तज्ज्ञ सांगतात 'या' वेळेत खा, कंट्रोलमध्ये राहिल ब्लड शुगर

Pune Accident News : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच; देवदर्शनाला निघालेल्या भाविकांची पिकअप उलटली, १७ जखमी

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Girija Oak Mother: अभिनेत्री गिरीजा ओकचे वडील आहेत सुप्रसिद्ध अभिनेते, आई काय करते?

SCROLL FOR NEXT