Kshitish Date  saam tv
मनोरंजन बातम्या

Kshitish Date : मराठी प्रेक्षकांसाठी नवं नाटक; क्षितिज दाते मुख्य भूमिकेत, कुठे अन् कधी पाहता येणार?

Kshitish Date New Natak : मराठी अभिनेता क्षितिज दाते नवीन नाटकामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत. नाटकाचे नाव आणि प्रयोगाच्या तारखा जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बोलविता धनी' नाटकातून क्षितिज दाते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बोलविता धनी' नाटकाचे लेखक अभिनेते हृषिकेश जोशी आहेत.

'बोलविता धनी' नाटकात क्षितीज दाते महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

'बे दुणे तीन'नंतर मराठी अभिनेता क्षितिज दाते आता एक नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचे 'बोलविता धनी' नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. 'बोलविता धनी' ची निर्मिती प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुस्कर यांनी केली आहे. तर नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. 'बोलविता धनी' हे नाटक जुन्या नाटकांच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगावरती भाष्य करते.

'बोलविता धनी' मधून अभिनेता क्षितिज दाते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बोलविता धनी' नाटकात क्षितीज दाते महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या नाटकात 13 ला कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'बोलविता धनी' हे नाटक नाट्य रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. 'बोलविता धनी' नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग 13 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे होणार आहे.

क्षितिज दातेने 'बोलविता धनी' नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो सांगतो की, "या दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे. नाटक दोन काळांमध्ये चालत राहतं आणि नाटकाच्या नावाप्रमाणे 'बोलविता धनी' या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने नाटकात लागतो. 'बोलविता धनी' म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा एक असतो, पण पडद्यामागे राहून त्याला सूचना देणारा दुसराच कोणी असतो."

क्षितिज दाते पुढे म्हणतो की, "मला हृषिकेश जोशींचं लिखाण प्रचंड आवडतं. त्यांची 'नांदी', 'संयुक्त मानअपमान' ही सगळी नाटकं मी पाहिली आहेत. शिवाय आता सुरू असलेल्या 'मी व्हर्सेस मी' या नाटकातही आम्ही दोघं एकत्र काम करतोय. त्यामुळे जेव्हा त्याने मला या नाटकासाठी फोन केला. तेव्हा मी काहीही विचार न करता लगेच हो बोलून टाकलं.त्याची कलाकार निवडीबाबतची पारख खूप चांगली आहे.या नाटकात विनोदाचं अंग खूप मोठं आहे. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद

पुण्यात मोठा राजकीय भूकंप! भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, बड्या नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Grils Born In December: डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो?

Indigo Flight Tickets: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! विमानाच्या तिकीट दरात वाढ न करण्याचे निर्देश; अन्यथा होणार कारवाई

Lonavala: लोणावळ्यात भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; गोव्याच्या २ पर्यटकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT