Me vs Me Marathi Natak Saam Tv
मनोरंजन बातम्या

Me vs Me Marathi Natak: रंगभूमीवर 'मी व्हर्सेस मी' मध्ये क्षितिश दाते ,शिल्पा तुळसकर, हृषिकेश जोशी दिसणार एकत्र

Me vs Me Marathi Natak: नव्या वर्षात तर विनोदापासून गंभीर, आशयघन अशा वैविध्यपूर्ण विषयांच्या नाटकांचे शुभारंभ होताना दिसत आहेत. मी व्हर्सेस मी' या नव्या नाटकाची मेजवानी नाट्यरसिकांना मिळणार आहे.

Manasvi Choudhary

हल्ली नवे विषय, नव्या संहिता रंगभूमीवर सादर होत आहेत. नव्या वर्षात तर विनोदापासून गंभीर, आशयघन अशा वैविध्यपूर्ण विषयांच्या नाटकांचे शुभारंभ होताना दिसत आहेत. या मांदियाळीत आता अमरदीप आणि कल्पकला निर्मित 'मी व्हर्सेस मी' या नव्या नाटकाची मेजवानी नाट्यरसिकांना मिळणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता क्षितिश दाते, शिल्पा तुळसकर हृषिकेश जोशी हे मराठीतले तीन गुणी नट एकत्र आले आहेत. संजय जमखंडी यांचे लेखन दिग्दर्शन असलेल्या या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी भरत नारायणदास ठक्कर, प्रवीण भोसले यांनी सांभाळली आहे. सहनिर्माती शिल्पा तुळसकर आहेत. शनिवार २५ जानेवारीला सायंकाळी ५.३० वा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड आणि रविवार २६ जानेवारी सायंकाळी ५.३० वा. तुपे नाट्यगृह हडपसर ३० जानेवारी काशिनाथ नाट्यगृह ठाणे रात्रौ ८.३० वा. तर शुक्रवार ३१ जानेवारी दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले ४.०० वा. येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.

'मी व्हर्सेस मी' हे नाटक गूढ आणि थरारक धाटणीच असलं तरी समाजातील काही संवेदनशील विषयावर आणि मानवी नात्यांवर भाष्य करतं. नाटकात विविध ठिकाण असल्यानं नाटकातली दृश्य रचना प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. या तीनही कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय. या तीनही कलाकारांना एकत्र पाहणं नाट्यरसिकांसाठी ट्रीट असणार आहे. या तिघांसोबत चिन्मय पटवर्धन महेश सुभेदार,दिनेश सिंह यांच्या भूमिका नाटकात आहेत. निखळ मनोरंजनसोबत आमच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळेल’, असा विश्वास या तीनही कलाकारांनी व्यक्त केला.

'मी व्हर्सेस मी' नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत समीर म्हात्रे तर ध्वनी मंदार कमलापुरकर यांचे आहे. गीतकार अभिषेक खणकर तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. वेशभूषा तृषाला नायक तर रंगभूषा जबाबदारी राजेश परब यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माता प्रणत भोसले असून सहाय्यक दिग्दर्शक संदेश डुग्जे आहेत. व्यवस्थापक प्रसाद खडके तर सूत्रधार दीपक गोडबोले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT