Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: 'मराठी शाळा पुन्हा भरणार…'; मराठी शाळाचं महत्व सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Krantijyoti Vidyalaya: मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होते.

यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या, ''आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत शाळेचे मोठे योगदान असते. मातृभाषेतून होणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करणारे आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटातून समाजाला योग्य संदेश मिळेल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त होत असल्याचा मला विशेष अभिमान आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे आशयसंपन्न चित्रपट सादर करत असतात. त्यांचा हा नवीन चित्रपटही नक्कीच मनाला स्पर्श करणारा ठरेल.”

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.”

क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटात नेमके कोण कोण कलाकार झळकणार आहेत याबाबत मात्र अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT