hrithik roshan  saam tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: हृतिकचा नवा चित्रपट कधी येणार भेटीला ? मुलाखतीत झाले उघड !

हृतिकच्या चाहत्यांनाही 'क्रिश ४' ची उत्सुकताही बऱ्याच दिवसांपासून होती. त्यातच आता 'क्रिश ४' बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Chetan Bodke

Hrithik Roshan: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने काल आपला ४९ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी केला. रोशन आपल्या अभिनयासह डॅशिंग लूकमुळेही बराच चर्चेत असतो. कोई मिल गया, क्रिश आणि क्रिश ३ त्याचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना खास भावला. त्याच्या चाहत्यांनाही 'क्रिश ४' ची उत्सुकताही बऱ्याच दिवसांपासून होती. त्यातच आता 'क्रिश ४' बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

राकेश रोशन निर्मित या 'क्रिश 4'ची कमान दुस-याकडे सोपवणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत होती. तर सध्या या चित्रपटाबाबत आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक रोशनने त्याच्या 'फाइटर', 'वॉर 2' आणि 'क्रिश 4' या चित्रपटांबद्दल मोठे अपडेट दिले होते. या मुलाखतीत हृतिक म्हणतो, "क्रिश ४ बद्दल सर्व गोष्टी ठरल्या असून शुटिंगचं काम सुद्धा पूर्ण झालंय."

सोबतच तो पुढे म्हणतो, "फक्त टेक्निकल माध्यमांवर काम करणं बाकी आहे. काही अडचणी दूर करायच्या आहेत. अशा सर्व गोष्टींवर काम झालं की, २०२३ च्या अखेरीस सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे." अशी माहितीच खुद्द हृतिकने दिली आहे. त्यामुळे एकूणच क्रिश ४ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडला असून चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणखी वाट बघावी लागणार आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक रोशनने त्याच्या 'फाइटर' आणि 'क्रिश 4' या चित्रपटाविषयी एक मोठे अपडेट दिले आहे. मुलाखतीत तो म्हणतो, 'आम्ही फायटरमध्ये वास्तविक लढाऊ विमानांमध्ये शूटिंग करत आहे. आम्ही नुकतेच सुखोईमध्ये चित्रीकरण केले आहे.

भारतीय वायुसेनेची शिस्त आपल्याला लागणे खूप प्रेरणादायी आहे. त्यांची देहबोली, शिस्त, धाडस आणि समजूतदारपणातून खूप काही शिकण्यासारखे आहे. हा अनुभव मला मिळाला याचा मला आनंद आहे.'हृतिक रोशनला 'वॉर 2' चित्रपटाबद्दलही विचारण्यात आले होते. तेव्हा हृतिकने त्याच्या चित्रपटाबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT