केआरकेवर बलात्काराचा आरोप; 'या' मॉडेलकडून तक्रार दाखल Saam Tv
मनोरंजन बातम्या

केआरकेवर बलात्काराचा आरोप; 'या' मॉडेलकडून तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई


पुणे : बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान KRK त्याच्या वादग्रस्त Controversial वक्तव्यामुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर त्याचे मत बिनधास्तपणे मांडत असतो. केआरके गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसून येत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी Salman Khan पंगा घेतला होता. त्यानंतर त्याने मिका सिंगला Mika Singh ट्रोल केले होते. तसेच केआरकेने अनेक कलाकारांवर टीका केली आहे. मात्र, आता आता त्यालाच मोठा झटका बसला आहे. त्याच्यावर बलात्कार Rape करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

एका ताशा नावाच्या महिलेने केआरकेवर हा आरोप Allegations केला आहे. एक लोकप्रिय फिटनेस मॉडेल आहे आहे. केआरके विरोधात 26 जुन 2011 रोजी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात ताशाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. तसेच अभिनेता केआरकेने देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

फिटनेसमुळे ताशा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेता केआरके सध्या दुबईत असल्याचे म्हटले जात आहे. गायक मिका सिंगने काही दिवसांपूर्वी केआरकेसाठी एक गाणं प्रदर्शित केले होते. या गाण्यात मिका सिंग म्हणाला होता की, केआरके कुत्रा आहे असं. तर त्यानंतर केआरकेने सुद्धा मिका विरोधात एक गाणे प्रदर्शित केले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Hawk Eye: ऑपरेशन हॉक आय'द्वारे ISISचे 70 अड्डे उद्ध्वस्त, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत ४५.१४ टक्के मतदान

Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT