Kriti Sanon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kriti Sanon: क्रिती सेनन बॉयफ्रेंडसोबत परदेशात; सिगारेट ओढताना दिसल्याने नेटकऱ्यांकडून ट्रोल, VIDEO

Kriti Sanon Video: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन नेहमीच चर्चेत असते. क्रिती सेननचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात ती बॉयफ्रेंडसोबत सिगारेट ओढताना दिसली आहे.

Shweta Bhalekar

क्रिती सेनन ग्रीसमध्ये सुट्टीत धमाल करत होती. याच दरम्यान तिचा व्हिडिओ समोर आला आणि विविध चर्चा सुरू झाल्यात. क्रिती आपल्या वाढदिवसासाठी ग्रीसमध्ये गेली होती. तिथला व्हिडीओ समोर आला. यात ती आपला बॉयफ्रेंड कबीर सोबत सिगारेट ओढत असल्याचं दिसत आहे, असा दावा काही लोक करत आहेत.

क्रितीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे, असं काहींचं म्हणणं आहे तर काहींनी सिगारेट ओढणं, आरोग्यासाठी हानिकारक आहे, असं म्हणत तिच्यावर टीका केली आहे. काहींनी तिची आई गीता सेनन यांचं जुनं ट्विट शेअर करत क्रितीला आरसा दाखवला आहे. क्रिती स्वतः सिगारेट ओढत नाही तसंच इतरांनाही त्यापासून परावृत्त करते, असं त्या ट्विटमध्ये तिच्या आईने म्हटलं होतं. त्याच ट्वीटचा आधार घेत काही जण क्रितीला ट्रोल करत आहे. दरम्यान, या व्हिडीओ बाबत अद्याप तिनं काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

जेव्हा क्रिती सर्वांसमोर सिगारेट ओढते

क्रितीने सर्वांसमोर सिगारेट ओढली आहे. 'बरेली की बर्फी' या चित्रपटात क्रितीला आपल्या भूमिकेसाठी धुम्रपान करावं लागलं होतं. त्यावेळचा अनुभव तिने सर्वांना सांगितला होता. आपण सिगारेट ओढत नाही पण चित्रपटातल्या त्या भूमिकेची गरज म्हणून आपण सिगारेट ओढली, असंही तिने चाहत्यांना स्पष्ट सांगितलं होतं.

क्रितीने 'आदिपुरुष' सिनेमात साकारलेली सीतामाई

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या सिनेमात प्रभासने प्रभू श्रीरामांची भूमिका तर क्रितीने सीतामातेची भूमिका साकारली होती. त्यामुळे एक सोज्वळ अभिनेत्री म्हणून तिचं कौतुक झालं होतं. इतर चित्रपटातल्या तिच्या भूमिकाही लोकांना आवडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

SCROLL FOR NEXT