Kriti Sanon Fitness Tips SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kriti Sanon Fitness Tips : क्रिती सेनॉनसारखी परफेक्ट फिगर हवीये? फॉलो करा 'हा' डाएट प्लान

Kriti Sanon Diet Plan : बॉलिवूडची सुपरकूल अभिनेत्री क्रिती सेनॉन नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिच्या या ग्लोइंग त्वचेचे आणि हेल्दी शरीराचे रहस्य जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावर क्रिती नेहमीच नवनवीन फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. क्रितीच्या दमदार अभिनयाने तिने अनेकांची मने जिंकली आहेत. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. क्रितीचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात.

क्रितीने आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसमुळे (Fitness Tips) अनेकांना वेड लावले आहेत. चाहते तिच्या फिटनेसचे दिवाने आहेत. अभिनेत्रीच्या फिटनेस प्रेमामुळे ती चाहत्यांसाठी स्पेशल आहे. स्वत:ला हेल्दी ठेवण्यासाठी क्रिती खूप मेहनत घेत असते. तसेच ती कायम चाहत्यांना सुद्धा फिट राहण्याचा सल्ला देते.

क्रिती सेनॉन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात मध टाकून पिते. त्यानंतर ती योगा करते. तसेच ती व्यायामासोबत वेट लिफ्टिंग, किकबॉक्सिंग, स्विमिंग, डान्सिंग अशा इतर अनेक गोष्टी करते. ज्यामुळे तिचा मूड फ्रेश राहतो. तसेच ती तंदुरुस्त शरीरासाठी वेट ट्रेनिंग करते. क्रितीला पिलेट्स व्यायाम करायला खूप आवडतो. तसेच ती नियमित योगा आणि व्यायामाचे प्रशिक्षण घेत असते.

क्रितीच्या फिटनेस वर्कआउटच्या व्हिडीओमधून ती नेहमीच चाहत्यांना शरीराची काळजी घेण्यास सांगते. क्रिती शरीराचे स्नायू मजबूत करण्यासाठी जीममध्ये खूप मेहनत घेत असते. क्रिती चेहऱ्याचे तारुण्य जपण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करते. क्रिती वर्कआउटसोबतच आहाराकडेही पूर्ण लक्ष देते. ती नेहमी हेल्दी पदार्थांचा (Diet Plan) आस्वाद घेते.

क्रिती दररोज दोन तासांनी काहींना काही पौष्टिक पदार्थ खात असते. ज्यामुळे तिचे पोट नेहमी भरलेले राहते. क्रिती वर्कआउटनंतर सकाळच्या नाश्त्यामध्ये उकडलेली अंडी, ब्राउन ब्रेड आणि प्रोटीन शेक या पदार्थांचे सेवन करते. क्रिती दिवसांतून दोनदा ग्रीन टी पिते. त्यानंतर क्रितीच्या दुपारच्या जेवणात ब्राउन राइस, भाजी-चपाती यांचा समावेश असतो. तसचे ती नॉन व्हेज पदार्थ देखील खाते. संध्याकाळी क्रिती स्नॅकमध्ये कॉर्न, ड्रायफ्रूट्स आणि प्रोटीन शेक घेते. तसेच रात्री खूप हलका आहार घेते. कारण रात्री हलके जेवण पचनास चांगले राहते आणि शरीर जड होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

SCROLL FOR NEXT