Kriti Sanon booked 'Adipurush' show for school students : बहुचर्चित चित्रपट 'आदिपुरुष'ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 'आदिपुरुष' चित्रपट त्यातील दृश्य आणि संवादांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संपूर्ण देशभरातून या चित्रपटावर टीका केली जात आहे. अशातच आता हा चित्रपट वेगळ्या कारणानं चर्चेत आला आहे. या चित्रपटात सीतेची भूमिका साकारलेली अभिनेत्री क्रिती सेननने एक अख्ख थिएटर बुक केल्याची माहिती समोर आली आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान अशी तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील सर्वच कलाकार सध्या ट्रोलिंगचा सामना करत आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा पल्ला गाठला आहे. दरम्यान क्रिती सेननने या चित्रपटाचा शो पाहण्यासाठी एक अख्ख थिएटर बुक केल्याची बातमी समोर आली आहे.
कुटुंबासाठी आणि विद्यार्थांसाठी खास शो
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, बुधवारी क्रिती सेननेने कुटुंबासाठी आणि तिच्या शाळेतील मुलांना चित्रपट दाखवम्यासाठी एका स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं आहे. त्यासाठी तिने दिल्लीत एक अख्ख थिएटर बुक केलं आहे. क्रितीने कुटुंबासोबत चित्रपट पाहता यावा यासाठी मल्टीप्लेक्सचा एक संपूर्ण शो बुक केला आहे. तसेच दिल्ली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थांसाठी खास आयोजन करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)
याच शाळेत शिकली क्रिती सेनन
क्रिती ही दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिकली आहे. क्रिती तिचं कुटुंब आणि तिच्या शाळेतील मुलांसोबत या शोचा आनंद घेणार आहे. लहान मुलांनी रामायणावर आधारित 'आदिपुरूष' हा चित्रपट आवर्जुन पाहायला हवा असं म्हणत क्रितीने या खास शोचं आयोजन केले आहे. या शोसाठी किती मुलं येणार आहे याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप समोर आली नाही. पण क्रितीने बुक केलेलया थिएटरमध्ये ३०० सीट आहे. त्यामुळे शोला गर्दी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थीही या खास स्क्रिनिंगसाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे. क्रिती सेनन शोदरम्यान विद्यार्थ्यांची संवादही साधणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Latest Entertainment News)
क्रितीचं शाळेवर विशेष प्रेम
दिल्लीत राहणारी क्रिती सेनन नेहमी दिल्लीचं कौतुक करताना दिसते. दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये क्रितीने शिक्षण घेतले आहे. क्रितीने वरुण धवनसोबतचा चित्रपट 'भेडिया'चंही प्रमोशन आपल्या शाळेत केलं होतं. यावेळी क्रितीने शाळेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेला शुभेच्छाही दिल्या होत्या. दरम्यान 'आदिपुरूष' चित्रपटाला संवादावर ट्रोल करण्यात येत असल्याने बुधवारपासून त्यात नवीन डायलॉग जोडले जाणार आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.