Krantijyoti Vidyalay Collection  saam tv
मनोरंजन बातम्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Box Office Collection First Week : हेमंत ढोमेच्या 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाने एका आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट 1 जानेवारी 2026ला रिलीज झाला.

'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट हेमंत ढोमे दिग्दर्शित आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपटाने एका आठवड्यात 6 कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे.

सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खूप कमी वेळात घर केले आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बंपर कमाई केली आहे. हा चित्रपट 1 जानेवारी 2026ला रिलीज झाला. आता सिनेमा प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत. या चित्रपटात मराठी शाळा आणि मराठी भाषेबद्दलचे मत, विचार मांडले आहेत. ज्यामुळे चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' बॉक्स ऑफिस कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल 6.14 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडला किती कोटी कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चित्रपटातील कलाकार

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, कादंबरी कदम, क्षिती जोग, निर्मिती सावंत आणि प्राजक्ता कोळी हे झळकले आहेत. चित्रपटातील 'स्वर्गात आकाशगंगा' हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

हेमंत ढोमे याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. यात फसक्लास दाभाडे, झिम्मा 2, झिम्मा यांचा समावेश आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट मुख्यतः मराठी शाळा, मातृभाषेतील शिक्षण आणि सामाजिक भावना यावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT