Ankita Walawalkar Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar : नजर काढली, औक्षण केलं, सासरी दणक्यात स्वागत...; अंकिताने घेतला कुणालरावासाठी खास उखाणा, VIDEO

Ankita Walawalkar Wedding : बिग बॉसफेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिताचा थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला.

Shruti Vilas Kadam

Ankita Walawalkar : बिग बॉसफेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिताचा थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. तिचा लग्न सोहळा तिच्या कोकणातील घरी संपन्न झाला. आता अंकिताची पाठवणी झाली असून मोठ्या उत्साहात तिच्या सासरच्या घरी गृहप्रेवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याचा व्हिडीओ अंकिताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओची सुरुवातच अंकिता आणि कुणालच्या प्रवासाने होते. त्यानंतर कुणालच्या गावी आणि अंकिताच्या सासरी माणगावला गेल्यावर या नवविवाहित जोडप्याचा फुलांची उधळन करुन स्वागत केले . त्यानंतर अंकिता आणि कुणाल दोघेही सुंदर असा उखाणा घेतला आणि सगळ्यांना भेटले.

यावेळी अंकिताने लाल रंगाची साधी पण सुंदर साडी नेसली आहे. तर कुणालने चिकनकारी पांढरा कुर्ता पायजमा घातला आहे. यासह दोघांच्या डोक्याला असलेल्या नाजूक मुंडावळ्या सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान, अंकिता आणि कुणालचा १६ फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा संपन्न झाला असून आता हे कपल त्यांच्या आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. लवकरच अंकिता तिच्या लग्नाचं खास गाणं शेअर करणार असून यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. हे गाणं स्वतः अंकिताचा नवरा कुणालने लिहून संगीतबद्ध केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT