Neetu Kapoor And Rishi Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neetu Kapoor: 'ते नेहमीच म्हणायचे हे करू नको...', ऋषी कपूर यांच्याबाबत पत्नी नीतू यांनी केला धक्कादायक खुलासा

Neetu Kapoor Confession About Rishi Kapoor: नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासोबत घालवलेल्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय वर्षांबद्दल सांगितले. यासोबत त्यांनी ऋषी कपूर यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले.

Priya More

Koffee With Karan 8:

करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या लोकप्रिय चॅट शोचा आठवा सीझन खूपच जबरदस्त ठरत आहे. 'कॉफी विथ करण'च्या 12 व्या एपिसोडमध्ये जुन्या काळातील दोन प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान आणि नीतू कपूर यांनी हजेरी लावली. दोन्ही अभिनेत्रींनी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक रंजक खुलासे केले. करणसोबत बोलताना नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासोबत घालवलेल्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय वर्षांबद्दल सांगितले. यासोबत त्यांनी ऋषी कपूर यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले.

'कॉफी विथ करण 8'मध्ये नीतू कपूर यांनी त्यांचे दिवंगत पती ऋषी कपूर यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची लव्हस्टोरी त्या काळी खूपच गाजली होती. या शोमध्ये त्यांनी ऋषी कपूर यांना डेट करत असतानाच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, ऋषी कपूर हे 'स्ट्रिक्ट बॉयफ्रेंड' होते आणि त्यांनी मला पार्टी करू दिली नाही. मी जेव्हा यश चोप्रासोबत शूटिंग करायचे तेव्हा रात्री उशिरा पार्ट्या व्हायच्या. पण मी कधीही पार्ट्यांमध्ये सहभागी झाले नाही कारण ऋषी मला नेहमी सांगत असे की हे करू नको, असे करू नको, घरी जा. मला पार्ट्यांमध्ये जाण्यास देखील त्यांनी मनाई केली होती.'

ऋषी कपूर यांच्या निर्बंधांमुळे नीतू कपूर यांनी कधीही लेट नाईट पार्टी केली नाही. त्यांनी सांगितले की, 'आम्ही यशजींसोबत खूप छान वेळ घालवला आहे. रात्री पार्टी करायचो. अंताक्षरी खेळायचो, डंब शराड्स खेळायचो. जणू पिकनिकच होती. खूप मजा आली. पण माझा बॉयफ्रेंड ऋषी कपूर होता. त्यामुळे मी कधीही अशी पार्टी केली नाही.'

नीतू कपूर यांनी पुढे असे सांगितले की, 'चिंटू जी (ऋषी कपूर) खूप गोड व्यक्ती होते. त्यांच्यात खूप प्रेम होते. पण असं काही तरी होतं ज्यामुळे त्यांनी कधीही प्रेम व्यक्त केले नाही. ते अंतर राखून लोकांवर दादागिरी करत असे. ते कधीच प्रेम दाखवत नव्हते. खासकरून माझ्यासाठी आणि मुलांसाठी ते खूप मोठे होते. आदर आणि सर्व काही. पण त्यांनी मुलांसह बरेच काही गमावले. ते कधीच मुलांचा चांगला मित्र होऊ शकले नाहीत.'

दरम्यान, ऋषी कपूर आणि नीतू सिंग हे बॉलिवूडचे त्या काळातील टॉप कपल होते. ऑनस्क्रिन त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळायची. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांनी 13 एप्रिल 1979 ला साखरपुडा केला. त्यानंतर 22 जानेवारी 1980 ला दोघांचे लग्न केले होते. लग्नानंतर नीतू या अभिनयापासून दूर गेल्या. या कपलला रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर ही दोन मुलं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT