Singham Again SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singham Again : 'सिंघम अगेन'मध्ये तगडी स्टार कास्ट; अजय, अर्जुन ते दीपिका, कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?

Shreya Maskar

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. दिवाळीच्या शुभ मुर्हतावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी किती मानधन घेतलं जाणून घेऊयात.

जॅकी श्रॉफ

'सिंघम अगेन'मध्ये जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी या चित्रपटासाठी 2 कोटी रुपयांचे मानधन घेतलं आहे.

टायगर श्रॉफ

'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफ सत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यासाठी त्यांनी 3 कोटी रुपये फी घेतली आहे.

अर्जुन कपूर

'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुनचं हे रूप पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. अर्जुनने देखील 6 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

दीपिका पादुकोण

'सिंघम' फ्रँचाइजीमध्ये दीपिका पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षक तिला पाहायला आतुर झाले आहेत. अशात प्रेग्नन्सीमध्ये दीपिकाने चित्रपटाचे शूटिंग केलं आहे. या चित्रपटात ती शक्ती शेट्टीची भूमिका साकारत आहे. 'लेडी सिंघम' जबरदस्त अॅक्शन दाखवली आहे. त्यामुळे दीपिकाने 6 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

रणवीर सिंह

'सिंघम अगेन'मध्ये 'सिम्बा' पाहायला मिळणार आहे. रणवीरने यासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

करीना कपूर खान

करीनाने 'सिंघम अगेन'मध्ये अवनी कामथची भूमिका साकारणार आहे. तिला 10 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.

अक्षय कुमार

खिलाडी अक्षय कुमार यांनी 'सिंघम अगेन'मध्ये काम करण्यासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तो या चित्रपटात पाहुणा कलाकार आहे.

अजय देवगण

अजय देवगण पुन्हा आपल्याला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने आधीही सिंघम आणि सिंघम रिटर्न्स मध्ये काम केलं आहे. यंदा या चित्रपटासाठी अजयने 35 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

1 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये येणार आहे. 'सिंघम अगेन' बनवण्यासाठी 350 कोटी रुपये बजेट झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TATA Indica: अशी रस्त्यावर अवतरली भारतीय INDICA कार; रीलॉन्चिंगनंतर रिकॉर्ड झाली ब्रेक विक्री, वाचा रोचक कहाणी

Hardik Pandya Catch : हार्दिक पंड्याचा कॅच कमालच, राधा यादवचाही कॅच लय भारी! बघा श्वास रोखायला लावणारे २ VIDEO

Share Market : ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने घेतली मोठी झेप; अवघ्या ६३ रुपयांवरून १९०० वर पोहोचला, गुंतवणूकदार मालामाल

69km मायलेज, 60000 रुपये किंमत; जबरदस्त आहे TVS ची 'ही' बाईक, जाणून घ्या फीचर्स

Maharashtra News Live Updates: महविकास आघाडीची उद्याची पत्रकार परिषद पुढे ढककली

SCROLL FOR NEXT