Actress Athiya Shetty and Indian cricketer K.L. Rahul's wedding dates are out  Saam Tv
मनोरंजन बातम्या

KL Rahul-Athiya: ठरलं...अथिया-केएल राहुलच्या लग्नाचा बार या तारखेला देणार उडवून...या मुहूर्तावर घेणार सप्तपदी

केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Pooja Dange

KL Rahul-Athiya Shetty Wedding Dates: सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु अनेक कार्यक्रमादरम्यान दोघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. अथिया केएल राहुलचे क्रिकेट सामने बघायला देखील केली आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत आणि त्यांच्या लग्नाच्या तारखाही समोर आल्या आहेत अशा चर्चा सध्या मीडिया वर्तुळात होत आहे.

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. केएल राहुल आणि अथिया जानेवारी 2023 च्या शेवटच्या आठवड्यात लग्न करू शकतात. त्यांच्या लग्नाला त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. डिसेंबर २०२२ च्या अखेरीस पाहुण्यांना आमंत्रणे पाठविले जातील अशी माहिती आहे. (Celebrity)

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचे सर्व फंक्शन्स 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहेत. सध्या दोघांपैकी कोणीही या तारखांवर भाष्य केलेले नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या तारखा बरोबर आहेत. दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. (KL Rahul)

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचे लग्न पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने पार पडणार आहे. त्यांच्या लग्न सोहळयात हळद, मेहंदी आणि संगीत असे सर्व कार्यक्रम असणार आहेत. त्यांचे लग्न परदेशात होणार नसून सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील 'जहान' या घरी होणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT