KK Last Performance Song Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

...अन् ते गाणं ठरलं शेवटचं; केके यांचा तो Video पाहून चाहते भावूक

केके यांनी कित्येक दशकं तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवलं

साम टिव्ही ब्युरो

KK Last Performance Song Video: बॉलिवूड (Bollywood) जगतावर पुन्हा मोठा आघात झाला. तरुणांचं ह्रदय हेलावून टाकणारा आवाज कायमचा हरपून गेला. केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचं मंगळवारी रात्री वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. केकेच्या परफॉर्मन्सचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते 'हम रहे ना रहे कल...' हे गाणे गाताना दिसत आहेत. त्यांच्या शेवटच्या गाण्याचे व्हिडिओ शेअर करून चाहते भावूक होत आहेत.

केके यांनी कित्येक दशकं तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. bluetooth च्या जमान्यातल्या या गायकाने बऱ्याच सुपरहिट गाण्यांना प्ले-बॅक दिला. हम रहे या ना रहे कल... पल याद आयेंगे पल या त्यानेच गायलेल्या गाण्याच्या ओळी आज लागू पडत आहेत. त्याच्या शेवटच्या कार्यक्रमाचे अनेक विडिओ त्याच्या फॅन्सनी शेअर केले आहेत.

दरम्यान, केके मंगळवारी कोलकत्ता येथे आले होते. एका कॉन्सर्टमध्ये ते सहभागी झाले होते. कॉन्सर्टनंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केकेंच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, ही बाब अद्यापही चाहत्यांना पचवणं कठीण झालं आहे.

केके यांची प्रसिद्ध गाणी

1. तड़प तड़प के इस दिल से... चित्रपट - हम दिल दे चुके सनम

2. प्यार के पल.... चित्रपट - पल

3. लबो को.... चित्रपट - भूल भुलैया

4. दिल इबादत.... चित्रपट - जन्नत

5. अभी अभी.... चित्रपट - जिस्म

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT