Jee Rahe The Hum Song Instagram
मनोरंजन बातम्या

Salman Khan New Song: पहिल्याच गाण्यातून ट्रोल झाल्यानंतर पुन्हा एक नवं गाणं रिलीज... आता पूजाला म्हणतोय 'जी रहे थे हम'

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील आज तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Chetan Bodke

Jee Rahe The Hum Song: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने गेल्या तीन दशकापासून इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले आहे. लवकरच सलमान त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील आज तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘जी रहें थे हम’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. जे स्वतः सलमान खानने गायले आहे. चला तर जाणून घेऊया गाण्याविषयी....

सुमारे आठ वर्षांपूर्वी, सलमान खानने ‘मैं हूं हीरो तेरा’ गाण्यामधून आपल्या दमदार गाणे प्रदर्शित केले होते. हे सुपरहिट गाणे दिल्यानंतर आता सलमान खान अमाल मलिकसोबत नवीन गाणे घेऊन परतला आहे. हे गाणे त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील आहे.

या गाण्याचे बोल ‘जी रहें थे हम’ आहेत, ज्याचा हे गाणं नुकतंच प्रदर्शित झाले आहे. सलमान या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. सलमाननं लाडक्या पूजासाठी ते गाणं गायल्यानंतर सोशल मीडियावर त्याला आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. या गाण्यात राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम देखील दिसत आहेत.

नेटकऱ्यांनी सलमानचं गाणं पाहिल्यावर अनेकांनी त्याला त्यावरुन ट्रोल केले आहे. याआधी सलमानचा या चित्रपटातील टीझर आणि दोन गाणे प्रदर्शित झाले असून त्यावेळी त्यातील त्याचा लूक आणि डान्स पाहून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आपलं वय काय आणि आपण करतो काय असा प्रश्नही त्याला विचारला होता.

नेटकरी गाणं पाहिल्यावर म्हणतात, “तुझा आवाज एकाच फ्लो मधला आहे. त्याच्यात काहीच नाविण्यपणा नाही. मुळात सलमान तू अभिनय सोडून गाण्याच्या कचाट्यात का पडतोय हे मला समजंत नाही.” तर आणखी एक म्हणतो, “चित्रपटात पैसे वाचवण्यासाठी गाण्याची सुरुवात केली आहे.” अशा प्रकारे नेटकऱ्यांनी सलमानला कमेंट्स केल्या आहेत.

सलमान खानची निर्मिती असलेला ‘किसी का भाई किसी की जान’ नावाचा चित्रपट सामजीनं दिग्दर्शित केला आहे. ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ‘किसी का भाई किसी की जान’च्या स्टारकास्टविषयी बोलायचे झाल्यास, त्यामध्ये व्यंकटेश दुग्गूबाती, पुजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंद्र सिंह, राघव जुयाल, शहनाज गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan : एअरस्ट्राइकला तालिबानचं प्रत्युत्तर! पाकिस्तानच्या ५ प्रांतावर हल्ला, १२ सौनिकांचा मृत्यू, अनेक चौक्यांवर कब्जा

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

Accident : आयटीआयसमोर भीषण अपघात, स्पीड ब्रेकरवर वाहन आदळलं अन् दोन तरुणांचा मृत्यू

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

SCROLL FOR NEXT