Sai Godbole SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sai Godbole : कौतुकास्पद! मराठी अभिनेत्रीच्या मुलीची भरारी, थेट Appleची ब्रँड अँबॅसेडर झाली

Kishori Godbole Daughter Sai Brand Ambassador Of Apple: मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोलेची मुलगी सई गोडबोले 'अ‍ॅपल'ची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. आईने मुलींचे कौतुक करत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोलेने (Kishori Godbole) मनोरंजन सृष्टीत आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. किशोरी अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

आता किशोरी गोडबोले आपल्या मुलीमुळे चर्चेत आली आहे. तिच्या मुलीने म्हणजे सई गोडबोलेने आईची मान उंचावली आहे. सई (Sai Godbole) 'अ‍ॅपल'ची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. किशोरी हिने सोशल मीडियावर पोस्टकरून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तसेच तिने आपल्या मुलीचे खूप कौतुक करत एक छान कॅप्शन देखील लिहिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "सई माझी मुलगी 'अ‍ॅपल'ची ब्रँड अँबॅसेडर (Brand Ambassador Of Apple) झाली आहे. गेल्या आठवड्यात अ‍ॅपलने लॉस एंजेलिस येथे कार्यक्रम आयोजित केला होता. माझ्या मुलीने मिळवलेला हा एक मोठा सन्मान आहे. आपली प्रतिभाच आपल्याला समाजात मोठे स्थान मिळवून देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. खूप मोठा हो!मला तुझा अभिमान आहे."

किशोरी गोडबोलेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांकडून तसेच कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एक स्टार स्टारकिड असूनही सईने स्वतःच्या हिंमतीवर एवढे मोठे यश मिळवले आहे. सई ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती एक उत्तम अभिनेत्री, डान्सर आणि गायिका आहे. तसेच ती अनेक ब्रँडसोबत देखील काम करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT