Kishore Kumar Stories Saam TV
मनोरंजन बातम्या

Kishore Kumar's Birthday : किशोरपासून सावधान! दिग्दर्शकांना मेटाकुटीला आणणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराचे काही रंजक किस्से

Pooja Dange

Kishore Kumar 107's Birth Anniversary : किशोर कुमार हे बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. या जगातून गेल्यानंतरही त्यांच्या आठवणी रसिकांच्या मनात कायम आहेत. 4 ऑगस्ट 1929 रोजी जन्मलेल्या किशोर कुमार यांनी चित्रपटसृष्टीतील गाण्यांना आपला मंत्रमुग्ध करणारा आवाज दिला. लोक अजूनही त्यांच्या गाण्यांचे दिवाने आहेत.

किशोर कुमार यांनी कधीही पैशासाठी गाणे गायले नाही, असे म्हटले जाते. अनेकवेळा त्यांना भरपूर पैसे ऑफर करण्यात आले, पण त्यांना गाणे आवडले नाही, म्हणून त्यांनी गाणे गायले नाही. किशोर कुमारच्या अनेक कथा आहेत, ज्यात तो एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व असल्याचे दिसून येते.

एकदा दिग्दर्शक-निर्माते एचएस रवैल किशोर कुमारना भेटायला गेले. थोडा वेळ बोलून ते निघू लागला तेव्हा किशोर कुमारनी त्यांचा हातावर चावा घेतला. रवैल स्तब्ध झाले. त्यांनी का चावले याचे कारण विचारले असता किशोर दा घराबाहेरील फलकाकडे बोट दाखवत म्हणाले, 'तुम्ही बोर्ड पाहिला नाही?' यानंतर रवैल यांनी फलक पाहिल्यानंतर त्यावर 'किशोरपासून सावधान' असे लिहिले होते.

किशोर कुमार गायनासोबतच अभिनयात देखील सरस होते. रोमँटिक चित्रपटांपासून ते कॉमेडी चित्रपटापर्यंत ते अशी पात्र साकारायचे जी तुम्हाला खऱ्या आयुष्तात देखील होती. त्यांच्या गोष्टी आजही चित्रपटसृष्टीत ऐकायला मिळतात. (Latest Entertainment News)

एका गाण्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही आवाजात गायले

1962 मध्ये कालिदास दिग्दर्शित 'हाफ तिकीट' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात किशोर कुमार यांनी 'आके सीधी लगी दिल पे जैसी' हे गाणे गायले होते, हे गाणे खूप गाजले होते, पण या गाण्याची खास गोष्ट म्हणजे हे गाणे किशोरने स्त्री आणि पुरुष या दोन्ही आवाजात गायले. खरंतर याआधी लता मंगेशकर हे गाणे गाणार होत्या, पण त्या गाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे किशोरने पुरुषी आवाजासोबतच स्त्रीच्या आवाजातही गाणे गायले.

बॉलिवूडमधील बड्या दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या हृषिकेश मुखर्जीचा किशोर कुमारच्या घरातील सुरक्षारक्षकाने पाठलाग केला होता. किशोर कुमारने बंगाली संयोजकासाठी शो केला होता, पण त्याने किशोर दा यांना पैसे दिले नाहीत.

किशोर दा यांनी त्यांच्या सुरक्षारक्षकाला सांगितले की, घराभोवती कोणी बंगाली बाबू दिसला तर त्याला हाकलून द्या. दरम्यान हृषिकेश मुखर्जी किशोर कुमारकडे चित्रपटाची ऑफर घेऊन आले, हृषिकेश मुखर्जीही बंगाली होते. सुरक्षारक्षकाने त्यांना आयोजक समजले आणि हुसकावून लावले.

जेव्हा किशोर दा यांच्या गाण्यांवर बंदी होती

1975-76 मध्ये देशात आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या आवाजावर रेडिओवर बंदी घालण्यात आली होती. खरे तर काँग्रेसने किशोर दा यांना गाणे गाण्यास सांगितले, पण किशोर दा यांनी तसे करण्यास नकार दिला. यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेसने ऑल इंडिया रेडिओवरील किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घातली होती. बंदी लागू करणारे काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ला हे नंतर नक्षलवादी हल्ल्यात मारले गेले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

SCROLL FOR NEXT