बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Mister Perfectionist) आमिर खानच्या (Aaamir Khan) प्रोडक्शन हाऊसचा ‘लापता लेडीज’ चित्रपट (Laapataa Ladies Film) रिलीज झाला आहे. चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
कॉमेडी आणि फॅमिली चित्रपट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, सविता मालवीय सह अनेक तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘लापता लेडीज’ चित्रपट १ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'लापता लेडीज' ही दोन नवविवाहित वधूंची कहाणी आहे. ज्या अचानक बेपत्ता होतात. किरण रावच्या दमदार कथेला कॉमेडीचा टच लावून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडला आहे. सॅकनिल्क या ट्रेड ॲनालिस्टच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी जेमतेम ६५ लाखांचीच कमाई केली आहे. या चित्रपटासोबतच मानुषी छिल्लरचा ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. याशिवाय विद्युत जामवालचा 'क्रॅक' आणि यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’ थिएटरमध्ये आहे.
रवी किशन व्यतिरिक्त चित्रपटात दुसरा मोठा अभिनेता नाही. चित्रपटाची कथेला थोडा कॉमेडी टच दिल्याने कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. 'लापता लेडीज' या सोशल ड्रामा कॉमेडी चित्रपटाला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कथा चाहत्यांना भावली आहे. चित्रपटाची निर्मिती ५ कोटींमध्ये झाली आहे. चित्रपट विकेंडला कशी कमाई करतोय, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. किरण राव दिग्दर्शित चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर चित्रपटाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.