आर्यनच्या सुरक्षेसाठी किंग खानचा मोठा निर्णय, बॉडीगार्ड रवी तैनात Saam Tv
मनोरंजन बातम्या

आर्यनच्या सुरक्षेसाठी किंग खानचा मोठा निर्णय, बॉडीगार्ड रवी तैनात

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मागील महिन्यात मुंबईमध्ये क्रूझवर एका कथित ड्रग पार्टीमध्ये पकडला गेला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मागील महिन्यात मुंबईमध्ये क्रूझवर एका कथित ड्रग पार्टीमध्ये पकडला गेला होता. मात्र, आर्यन खान आता जामिनावर बाहेर आला आहे. या घटनेनंतर शाहरुख खानला आपल्या मुलाची खूप काळजी वाटू लागली आहे. तो त्याच्याकरिता नवीन बॉडीगार्डच्या शोधात असल्याची बातमी येत होती. तर सूत्रांप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार त्याचा विश्वासू रवी सिंग त्याचा मुलगा आर्यन खानसोबत असणार आहे.

हे देखील पहा-

शाहरुख खान आणि गौरी खान त्यांचा मुलगा आर्यन खानकरिता बॉडीगार्ड शोधत असल्याची बातमी काही दिवसाअगोदरच आल्यापासून मुंबई मधील सुरक्षा कंपन्यांनी खूप रस दाखवला आहे. चित्रपट उद्योगातील मिळालेल्या माहितीनुसार की १२ सुरक्षा कंपन्या आणि खाजगी अंगरक्षकांनी नोकरीकरिता शाहरुख खानच्या रेड चिलीज कार्यालयात त्यांचे अर्ज पाठवण्यात आले आहेत.

सेलिब्रेटी आणि नाइट क्लबची सुरक्षा हाताळण्याचा या लोकांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. आर्यन खान किंवा शाहरुख खानसाठी नवीन अंगरक्षक नेमले जाणार की नाही याची पुष्टी स्त्रोताने केली नाही. परंतु, त्यांनी उघड केले की, अद्याप कोणत्याही अर्जाला प्रतिसाद मिळालेला नाही. बॉडीगार्ड रवी सिंग हे शाहरुख खान बरोबर दीर्घकाळापासून आहेत आणि ते त्यांच्या कुटुंबामधील एक भाग मानले जात आहेत.

शाहरुखचा बॉडीगार्ड रवी त्याच्यासोबत मागील अनेक वर्ष आहे. रवीने आजवर शाहरुखची सुरक्षा केली आहे. आर्यन जेव्हा- जेव्हा एनसीबी कार्यालयात गेला आहे. तेव्हा रवी त्याच्या बरोबर सावलीप्रमाणे राहिला आहे. याच विश्वासामुळे शाहरुखने त्याची नेमणूक आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून केली आहे. शाहरुख स्वतःसाठी दुसऱ्या बॉडीगार्डची नेमणूक करणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT