Kim Kardashian saamtv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

Kim Kardashian in big boss house : इंटरनॅशनल सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध मॉडेल किम कार्दशियन बिग बॅासच्या घरात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. ती आपल्या बहिणींसह शोमध्ये सहभागी होऊ शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सलमान खानचा बिग बॅास शो हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. बिग बॅास १८ चे पर्व सध्या सुरू आहे. यामध्ये अनेक नामांकित स्पर्धकांनी भाग घेतला आहे. मात्र, अद्याप या शोला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बिग बॅासच्या टीमने आता काही स्पर्धकांना घरात वाइल्डकार्ड एन्ट्री देण्याचे ठरवले आहे. यातच इंटरनॅशनल सेलिब्रिटी आणि अमेरिकन मॅाडेल किम कार्दशियन बिग बॅासमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री घेणार असल्याची माहिती मिळत आहे. किम कार्दशियनसह तिच्या बहिणी कार्दशियन सिस्टर्सशी बिग बॅासच्या टीमने संपर्क साधल्याची माहिती आहे.

कार्दशियन सिस्टर्स

कार्दशियन सिस्टर्स, किम कार्दशियन आणि कोर्टनी कार्दशियन, क्लो कार्दशियन , केंडल जेनर, काइली जेनर या सर्व बहिणी इंटरनॅशनल सेलिब्रिटी आणि मॅाडेल आहेत. यामध्ये किम कार्दशियन आणि तिच्या दोन बहिणींना बिग बॅासच्या टीमने संपर्क केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कार्दशियन सिस्टर्स बिग बॅासच्या घरात खरेच दिसणार आहेत की नाहीत याची उत्सुकता बिग बॅासच्या प्रेक्षकांमध्ये आहे. किम कार्दशियन डिसेंबरमध्ये सलमान खानच्या बिग बॅासच्या घरात एन्ट्री मारणार आहे. यावेळी ती गेस्ट म्हणून येणार की वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून घरात राहणार, याची अद्याप माहिती मिळाली नाही.

बिग बॅास शो

बिग बॅास शो हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. यामध्ये कलाकारांनी आणि काही स्पर्धकांनी या शोला नेहमी टीआरपीच्या शर्यतीत पुढे ठेवण्यासाठी मेहनत घेतली. यंदाच्या बिग बॅास १८ मध्ये अनेक नामांकित कलाकारांनी भाग घेतले, पण तरीही शो फ्लॅाप ठरत असल्याचे म्हटले जात आहे. शोला अजून रंगतदार करण्यासाठी यामध्ये कार्दशियन सिस्टर्सची एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.

किम कार्दशियन आणि तिच्या बहिणी अगोदर एकदाच भारतात आले होते. उद्योगपती मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नात त्यांनी हजेरी लावली होती.

Edited by: Priyanka Mundinkeri

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT