koffee With Karan Saam Tv
मनोरंजन बातम्या

koffee With Karan : सिद्धार्थसोबतच्या नात्याची कियारानं अखेर दिली कबुली; म्हणाली, तो मित्रापेक्षाही...

कियारा अडवाणी तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दलही 'कॉफी विथ करण' या शोमध्ये बोलताना दिसली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॅालिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळं चर्चेत असतो. या लोकप्रिय चॅट शोमध्ये सेलिब्रिटींच्या 'पर्सनल टू प्रोफेशनल' लाईफबाबत अनेक खुलासे होत असतात. या शोच्या मागील एपिसोडमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि विकी कौशल यांनी हजेरी लावली होती.

आता 'कॉफी विथ करण सीझन ७' या शोच्या आगामी भागात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani) सहभागी होणार आहेत. कबीर सिंग चित्रपटातील ही जोडी लवकरच या शोमध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. याचसोबत शाहिद कपूर असे एक गुपित उघडणार आहे, ज्यामुळे कियारा आणि सिद्धार्थच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही.

'कॉफी विथ करण'च्या या आगामी भागात कियारा आणि शाहिद त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक खुलासे करणार आहेत. याशिवाय कियारा अडवाणी तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दलही या शोमध्ये बोलताना दिसली. शोमध्ये करण जोहर, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कियारा त्यांच्या नात्याचे वर्णन करत म्हणली 'सिद्धार्थ माझ्यासाठी मित्रापेक्षा जास्त आहे'.

इतकंच नाही तर प्रोमोच्या शेवटी शाहिद कपूर कियाराकडे बोट दाखवत म्हणतो, 'या वर्षाच्या अखेरीस मोठ्या अनाउंसमेंटसाठी तयार राहा आणि ही अनाउंसमेंट कोणत्याही चित्रपटाशी निगडीत नसणार आहे.' आता शाहिद कपूरच्या या हिंटमुळे कियारा आणि शिद्धार्थचे चाहते त्यांच्या लग्नाविषयी ही अनाउंसमेंट असेल अशी अटकळ बांधली जात आहे.

'शेरशाह' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. या जोडीच्या रिलेशनशिपच्या खबरामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते, परंतु दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले नाही. प्रोफेशनली बोलायचे झाले तर कियारा अडवाणी ही सध्या बॉलिवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. ती 'भूल भुलैया २' ते 'कबीर सिंग', 'गुड न्यूज' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा महत्वाचा भाग होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Akola Fire : अकोल्यात भल्या पहाटे अग्नितांडव, जेजे मॉलला लागली भीषण आग

Ladaki Bahin Yojana : या लाडक्या बहि‍णींनाच यापुढे ₹१५०० मिळणार, आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे, वाचा

SCROLL FOR NEXT