Sidharth-Kiara Get Trolled on Social Media  Saam TV
मनोरंजन बातम्या

Sidharth-Kiara : लग्नानंतरच्या त्या फोटोमुळं कियारा ट्रोल, नेटकऱ्यांनी पसरवली ही भलतीच अफवा

कियाराला पाहून नेटकऱ्यांमध्ये भलतीच चर्चा सुरू झाली.

Pooja Dange

Kiara Advani Gets Trolled: बॉलिवूड कपल सिद्धार्थ आणि कियारा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सगळीकडे या दोघांच्या चर्चा सुरू आहेत. सिद्धार्थ आणि कियारा लग्न झाल्यानंतर दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी जैलसलमेर एअरपोस्टवर स्पॉट करण्यात आले.

यावेळी कियाराला पाहून नेटकऱ्यांमध्ये भलतीच चर्चा सुरू झाली. कियाराने ब्लॅक आऊटफिट घातला होता. तसेच त्यावर तिने ग्रे आणि ब्लॅक शॉल घेतली होती. कियारा तिची शॉल सारखी सावरत होती. कियारा जशी तिची शॉल सावरत होती त्यावरून ती प्रेग्नेंट आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. नेटकरी म्हणत आहे कियारा शॉलने तिचे पॉट लपविण्याचा प्रयत्न करत होती.

कियारा अडवाणीचा जैसलमेर एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर ट्रोल होत होता. आधी काळे कपडे घातले म्हणून ती ट्रोल होत होती. आता शॉलने पोट झाकले त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. एका नेटकऱ्याने अभिनेत्रीला गर्भवती असल्याचे सांगितले आहे. नेटकाऱ्याने लिहिले आहे, 'या मॅडम ३-४ महिन्यांत गुड न्युज देणार आहेत, तिच्या प्रेग्नेंसीची बातमीही येणार आहे. तिने तिचे पोट शॉलने लपवले आहे...' कियाराच्या प्रेग्नेंसीबद्दल ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या फक्त अफवा आहेत.

कियारा अडवाणीला तिच्या नवीन फोटोंमुळे ट्रोल करणाऱ्यांवर काही नेटकरी राग व्यक्त करत आहेत. ट्रोल्सनी ते काय बोल्ट आहेत याचा विचार करण्याची गरज आहे, कियारा अडवाणी कधी कोणत्या वादात नसते, त्यामुळे तिला ट्रोल करणाऱ्यांवर नेटकरी रागावले आहेत. कियारा ही इंडस्ट्रीतील सर्वात गोंडस अभिनेत्री आहे, तिला लोक खूप आवडतात. त्यामुळे तिला काही बोलले तिच्या चाहत्यांच्या पचनी पडलं नाही.

लग्नानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन आज म्हणजेच ९ फेब्रुवारीला दिल्लीत पार पडणार आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार सिड आणि कियारा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रंग भरताना दिसणार आहेत. यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन १२ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्षणात अनर्थ! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन्...; महाडमध्ये थरारक अपघात|VIDEO

Papad Chivda Recipe : शाळेतून आल्यावर मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा पापड चिवडा, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये भाजप-शिवसेना युती; सूत्रांची माहिती

Viral Video: झोपेत लोळत लोळत १० व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडला, ८ व्या मजल्यावर ग्रीलमध्ये उलटा लटकला, दैव बलवत्तर म्हणून...

ठाकरे घराण्याचा नवा राजकीय प्रयोग, आदित्य-अमित ठाकरे मुंबईत एकत्र; प्रचाराची सूत्रं नव्या पिढीच्या हाती|VIDEO

SCROLL FOR NEXT