Khushi Mukherjee Viral Video Actress Bursts Firecrackers On Road After Car Damage In Lokhandwala 
मनोरंजन बातम्या

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

Actress Scandal: अभिनेत्री खुषी मुखर्जी हिच्या कारला लोखंडवळ्यात धडक बसल्यानंतर ती संतापली आणि रस्त्यावर फटाके फोडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Scandal: ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिअॅलिटी शोमधून चर्चेत आलेली अभिनेत्री खुषी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिचा संताप आणि रस्त्यावरचा गोंधळ. लोखंडवळा परिसरात तिच्या कारला धडक बसल्यानंतर ती थेट रस्त्यावर उतरली आणि फटाके फोडत संताप व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

खुषी मुखर्जी आपल्या निळ्या मर्सिडीज सेडानमधून लोखंडवळा परिसरातून जात होती. यावेळी तिच्या कारला एका ऑटो रिक्षाने हलकी धडक दिली. धडक झाल्यानंतर ऑटोचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. संतापलेल्या खुषीने थेट कार थांबवली आणि रस्त्यावर उतरून विक्रेत्यांवर तसेच आसपासच्या लोकांवर ओरडू लागली.

व्हायरल व्हिडिओमध्ये खुषी संतापलेली दिसते. ती म्हणते, “माझी गाडी ठोकली आणि तुम्ही इथे फटाके विकताय? हे शहरच वेडं झालंय का?” एवढंच नव्हे, तर तिने काही फटाके रस्त्यावर फेकले आणि त्याचा आवाज परिसरात घुमला. अनेक जणांनी मोबाईलवर हा प्रकार रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

या दरम्यान, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. खुषीने पोलिसांशी थेट चर्चा करत विचारलं, “या लोकांचं काय सुरु आहे का? माझी गाडी का ठोकली? कोणी जबाबदार आहे का?” मात्र पोलिसांनी शांतपणे परिस्थिती हाताळत खुषीला शांत राहण्याचा सल्ला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनोख आंदोलन

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT