Manasvi Choudhary
पावसाळा सुरू होताच आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. . या ऋतूत दमट वातावरणामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस वेगाने पसरतात. अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.
सर्दी, फ्ल्यू, टायफॉईड, मलेरिया आणि डेंग्यू हे संसर्गजन्य आजार पावसाळ्यात उद्भवतात. हे आजार टाळण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशत्ती मजबूत असणे महत्वाचे आहे.
यासाठी पावसाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटदुखी, फूड पॉइझनिंग किंवा संसर्ग होऊ शकतो.कोणते पदार्थ पावसाळ्या खावे आणि कोणते खाऊ नये? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पावसाळ्यात फळांचा आहारात समावेश करा. पावसाळ्यात सफरचंद, पपई, चेरी आणि डाळिंब या फळांचे आवर्जून सेवन करा.यातील पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतील.
आयुर्वेदात मसाल्यांचा वापर औषध म्हणून केला जातो. हळद, आले, लसूण, काळीमिरी या मसाल्याचे पाणी प्या. आहारात देखील हे मसाले वापरा यामध्ये बुरशीविरोधी, विषाणूविरोधी गुणधर्म असतात.
पावसाळ्यात भाज्यांचे सेवन करा. दुधी भोपळा, कारले, काकडी, या भाज्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतील. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवतील.
पावसाळ्यात उघड्यावरील समोसे, वडापाव यासांरखे तळलेले, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका. कारण या काळात जिवाणूंचा धोका अधिक वाढतो यामुळे पोटदुखी होऊ शकते.
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे कारण यामध्ये किटके असू शकतात जी शरीरासाठी हानिकारक ठरतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.