Khushi-Vedang SAAM TV
मनोरंजन बातम्या

Khushi-Vedang : हात पकडला अन्...; खुशी कपूर-वेदांग रैनामध्ये नेमकं काय घडलं? व्हायरल VIDEOनं वेधलं लक्ष

Khushi Kapoor-Vedang Raina Video : सध्या सोशल मीडियावर खुशी कपूर आणि वेदांग रैनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री खुशी कपूर (Khushi Kapoor) अनेक वेळा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. खुशी कपूरचे नाव गेल्या काही काळापासून वेदांग रैना(Vedang Raina) सोबत जोडले जाते. अशात आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये खुशी कपूर आणि वेदांग रैनामध्ये संवाद होताना दिसत आहे.

काल (9 जून) बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरचा वाढदिवस होता. सोनम कपूरने 'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सोनम कपूर काल 40 वर्षांची झाली आहे. तिची धमाकेदार बर्थडे पार्टी काल अनिल कपूरच्या बंगल्यावर पार पडली. या पार्टीला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. यात खुशी कपूर आणि वेदांग रैना देखील आले होते. या पार्टीतील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये खुशी कपूर आणि वेदांग रैना एकमेकांशी बोलताना दिसत आहे. बराच काळ दोघे एकमेकांशी बोल्यानंतर खुशी कपूर तेथून जायला निघते. तेव्हा वेदांग रैना तिचा हात पकडतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. वेदांग खुशीला त्याचा फोनही दाखवत आहे. त्यांचा हा क्यूट क्षण कॅमेरात कैद करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एकीकडे व्हिडिओतील त्यांची केमिस्ट्री अनेक चाहत्यांना खूप आवडली. दुसरीकडे काही नेटकरी खुशी कपूर आणि वेदांग रैना यांच्यात भांडण झाल्याचे म्हटले आहे.

खुशी कपूर आणि वेदांग रैना यांनी 'द आर्चीज' चित्रपटात एकत्र काम केले आहे. व्हिडीओमध्ये खुशी कपूर आणि वेदांग रैना दोघांनी देखील काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. खुशीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस तर वेदांगने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी जय्यत तयारी सुरू

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

चणे की शेंगदाणे? आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर काय?

Brownies Recipe : अंड्याशिवाय बनवा मऊ, टेस्टी चॉकलेटी ब्राउनी, वाचा सोपी रेसिपी

अंगावर काटा आणणारा अपघात! २५१ kmph वेगातील BMW चा चुराडा; हायवेवर मृतदेहांचे अवयव विखुरले

SCROLL FOR NEXT