सध्या सर्वत्र 'देवमाणूस' (Devmanus) आणि गौतमी पाटीलची चर्चा पाहायला मिळत आहे. 'देवमाणूस' या मालिकेत नृत्यांगना गौतमी (Gautami Patil) पाटीलने धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. यामुळे मालिकेच्या टीआरपीमध्ये नक्कीच वाढ होईल. 'देवमाणूस' मालिकेत मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता किरण गायकवाड झळकला आहे. 'देवमाणूस' मालिकेत किरण गायकवाड 'हिम्मतराव लेडीज टेलर' नावाने टेलरिंगचे दुकान चालवत आहे. आपल्या शिवण कौशल्याने त्याने महिलांना वेड लावले आहे.
'देवमाणूस' महिला टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. तेव्हा ब्लाऊज शिवण्यासाठी गौतमी पाटील 'हिम्मतराव लेडीज टेलर' या दुकानात येते. तेव्हा तिच्यात आणि 'देवमाणूस'मध्ये भन्नाट संवाद घडतो. गौतमी 'देवमाणूस'ला बोलते की," माझ्यावर चान्स मारतोय…" या एपिसोडला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात आता गौतमी पाटील आणि 'देवमाणूस' फेम नरु आजीचा (Naru Aaji) एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील आणि नरु आजी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत."पाव्हणं जेवला काय…" या गौतमी पाटीलच्या गाण्यावर नरु आजीने ठेका धरला आहे. त्यांची डान्समधील एनर्जी खूपच कमाल आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूपच भारी आहेत. तसेच गौतमीने आपल्या कातिल अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.
व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलने जांभळ्या रंगाची पिवळा काठ असलेली नऊवारी साडी नेसली आहे. तर नरु आजीने पांढऱ्या रंगाची लाल काठाची साडी नेसली आहे. नरु आजीचा डॅशिंग लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. डोळ्याला गॉगल लावून त्या लय भारी दिसत आहे.
गौतमी पाटील आणि नरु आजीच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स , लाइक्सचा वर्षाव होत आहे. बहुप्रतिक्षित 'देवमाणूस' मालिका 2 जूनपासून रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'देवमाणूस' मालिकेचा हा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.