Khushi Kapoor Google
मनोरंजन बातम्या

Khushi Kapoor : श्रीदेवीच्या आठवणीत भावुक झाली खुशी कपूर; म्हणाली, 'आज ती असती तर...'

Khushi Kapoor Emotional In LoveYapa Trailer Launch : खुशी कपूर तिच्या आगामी चित्रपट लवयापाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी तिच्यासमोर तिच्या आईचा उल्लेख करण्यात आला त्यामुळे ती भावुक झाली.

Shruti Kadam

Khushi Kapoor : श्रीदेवीचे नाव आजही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये गणले जाते आणि आता तिच्या दोन्ही मुलींनी तिच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. जान्हवी कपूरने खूप पूर्वी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी आता तिची धाकटी बहीण खुशी कपूर लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'लवयापा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, खुशी आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत या चित्रपटात दिसणार आहे. या खास प्रसंगी, खुशी तिच्या आईची आठवण काढून भावनिक झाली.

खुशी कपूर आणि जुनैद खान स्टारर 'लवयापा' हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी प्रदर्शित होणार आहे. 'लवयापा' या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे, त्याचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला, या कार्यक्रमात अभिनेत्री भावुक झाली. खरंतर, कार्यक्रमादरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला तिच्या आईबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने त्याबद्दल बोलण्यास नकार दिला.

खुशीने झाली भावुक

कार्यक्रमादरम्यान, खुशीला विचारण्यात आले की जर तिची आई या क्षणी तिच्यासोबत असती तर तिला कसे वाटले असते? तर खुशीने यावर उत्तर देत ती आज असती तर नक्कीच भावनिक झाली असती. पण हा एक असा मुद्दा आहे ज्याबद्दल मी बोलू इच्छित नव्हती. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमिर खानने यावर पुढे बोलताना सांगितले की श्रीदेवी एक अद्भुत अभिनेत्री होत्या. तो म्हणाला की तो श्रीदेवीचा खूप मोठा चाहता आहे आणि नेहमीच त्याला तिच्यासोबत चित्रपट करायची इच्छा होती.

या ट्रेलर लाँचसाठी पाहुणा म्हणून उपस्थित असलेला अभिनेता आमिर खान पुढे म्हणाला, मला श्रीदेवीसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, पण हा आनंदाचा चित्रपट आहे, हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण असता. जेव्हा मी चित्रपट पाहिला तेव्हा मला असे वाटले की मी पुन्हा श्रीदेवीला पाहत आहे. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि श्रीदेवी कुठेही असली त्यांना खुशीचा खूप अभिमान असेल याची मला खात्री आहे. मला अजूनही त्यांची खूप आठवण येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT