CM Eknath Shinde In Khupte Tithe Gupte Saam Tv
मनोरंजन बातम्या

CM Eknath Shinde In Khupte Tithe Gupte: बाळासाहेब की आनंद दिघे? मुख्यमंत्र्यांच्या जवळची व्यक्ती कोण; एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर

अवधुत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये आगामी भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळची व्यक्ती कोण यावर स्पष्ट उत्तर दिलंय...

Chetan Bodke

Chief Minister Eknath Shinde Latest News: संगीतकार, गायक, निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते याचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो टेलिव्हिजन विश्वासह सर्वत्र कमालीचा चर्चेत राहिला. काही वर्षांपुर्वी सुरू झालेल्या शोचा येत्या ४ जूनपासून नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी सीझनमध्ये पहिली व्यक्ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार असल्याची घोषणा काही दिवसांपुर्वीच झाली होती. आगामी भागात अवधुत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये आगामी भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जवळची व्यक्ती कोण यावर स्पष्ट उत्तर दिलंय...(Latest Entertainment News)

अवधुत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोचे गेले दोन्हीही सीझन राजकारण्यांमुळे कमालीचे चर्चेत राहिले आहेत. आता या सीझनमध्ये देखील राजकारण्यांसह इतर क्षेत्रातील मंडळींच्या येण्यानं हा शो चर्चेत राहिल काही शंका नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाखतीचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अवधूत गुप्ते मुख्यमंत्र्यांना जर तुम्हाला एक कॉल करायाचा असेल तर; पहिला कॉल कोणाला कराल, आनंद दिघे की बाळासाहेब ठाकरे? असा प्रश्न तो विचारतो.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवधूतला उत्तर देत म्हणतात, ‘अरे अवधूत दोघांनाही कॉन्फरन्स कॉल केला तर चालेल का?’ असं विचारत टीझर संपतो. याच प्रश्नावर मुख्यमंत्री अवधुतला काय उत्तर देणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

अवधुत गुप्तेच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासगी आणि राजकीय आयुष्यात अनेक घटनांना आणि गोष्टींवर अवधुत बोलतं करणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील चालू राजकीय स्थितीवर देखील त्यांची मते मांडणार आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकं या शोमध्ये काय बोलणार, मनातल्या गोष्टी कोणाला सांगणार? याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ या शोची घोषणा झाल्यापासून अवधुतचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. या पर्वात कोणकोणत्या दिग्गज चेहेऱ्यांना भेटता येणार, कोणाच्या मनात काय खुपतंय? हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. या नव्या पर्वाच्या पहिल्या भागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. तर दुसऱ्या भागात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahila Rojgar Yojana: खुशखबर! महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१०,०००; तुम्ही पात्र आहात का? चेक करा

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

'हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये, घरीच योगा करावा, कारण..'; भाजप आमदार पडळकर पुन्हा बरळले

Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

SCROLL FOR NEXT