Aai Kuthe Kay Karte Daily Updates: अरूंधती आशुतोषला सोडून एकटीच जाणार परदेशी? नव्याने करणार करियरचा श्री- गणेशा...

Madhurani Prabhulkar World Tour: आजच्या भागात अरूंधतीला एक गुड न्यूज मिळणार आहे. त्यामुळे ती एका बाजुला आनंदित ही आहे, आणि भावूक देखील झाली आहे.
Madhurani Prabhulkar World Tour Latest Episode
Madhurani Prabhulkar World Tour Latest Episode Saam Tv

Aai Kuthe Kay Karte Latest Update: मधुराणी प्रभुलकर अर्थात अरूंधती लवकरच परदेश दौऱ्याकरिता जाणार आहे, गेल्या काही दिवसांपुर्वी मालिकेत वीणा नावाचे पात्र आले आणि मालिकेत कमालीचा नवा ट्विस्ट आला. वीणाची एन्ट्री झाल्यापासून मालिकेतील सर्व कथा तिच्या भोवतीच फिरत आहे. दरम्यान आजच्या भागात अरूंधतीला एक गुड न्यूज मिळणार आहे. त्यामुळे ती एका बाजुला आनंदित ही आहे, आणि भावूक देखील झाली आहे.

Madhurani Prabhulkar World Tour Latest Episode
HBD Jr NTR: साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे टॉप ६ चित्रपट आवर्जून पाहा

आजच्या भागात अर्थात २० मे रोजीच्या भागात, भूतकाळच्या आठवणींमध्ये हरवलेल्या वीणाला अनिरूद्धचा फोन येतो. तितक्यात अरुंधती आशुतोषला आठवण करुन देते की त्याला वीणासोबत काही महत्वांच्या विषयावर बोलायचं आहे. असा हा फॅमिली ड्रामा सुरू असलेल्या वातावरणात अरूंधतीला एक गुड न्यूज मिळाली आहे. (Latest Entertainment News)x1

दरम्यान अरुंधती फेम मधुराणी सध्या ऑस्ट्रेलिया टूरवर सुट्टीचा आनंद लुटत आहे, ती तिच्या मुलीसोबतत भटकंती करते आहे. तिच्याप्रमाणे आता मालिकेच्या कथानकातही फेरबदल करण्यात आलाय. मधुराणी काही दिवस परदेशात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेल्याने अरुंधती पुढचे काही दिवस मालिकेत दिसणार नाही.

शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, अरुंधतीला नुकतीच वर्ल्ड टूरची संधी मिळाली. जगातील प्रतिष्ठित शहरांमध्ये प्रतिष्ठित मंचावर तिला गाण्याची संधी मिळाली असल्याचे मालिकेच्या कथानकात दाखवण्यात आले आहे. टीझरच्या सुरूवातीला अरुंधतीचा मुलगा यश तिच्यासाठी ही आनंदाची बातमी घेऊन येतो आणि तिच्यासाठी खास पुष्पगुच्छ देखील आणतो. त्याने आपल्या आईसोबत अख्ख्या कुटुंबाला गुड न्यूज सांगतो, ही गुड न्यूज ऐकून सर्वच तिचे तोंडभरून कौतुक करतात. अरुंधतीला तातडीने या टूरसाठी निघावं लागणार असल्याने ती कसं काय सर्व सांभाळणार या चिंतेत दिसते.

Madhurani Prabhulkar World Tour Latest Episode
Vivek Agnihotri On Aishwarya Rai Bachchan: ‘तुम्हाला काय करायचंय?’; ऐश्वर्या रायवर टीका करणाऱ्या विवेक अग्निहोत्रींना नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल...

आशुतोष-अरुंधती अनिरुद्धला कंपनी हँडओव्हरचे कॉन्ट्रॅक्ट दाखवत नसल्यामुळे तो सध्या त्या विचारात आहे. आशुतोषची बहिण असलेल्या वीणाने गुंतवणूक करून तो तिच्या कंपनीत ढवळाढवळ करणार असल्याचे त्याला वाटते. आशुतोष या संबंधित वीणाला सर्व सांगण्याचा मनात ठाम विचार करतो, अर्थात वीणाचे कान भरण्याचा त्याची योजना असते. तो त्याने तयार केलेल्या कॉन्ट्रक्टवर सही करण्याचं वीणाला सांगतो.

Madhurani Prabhulkar World Tour Latest Episode
Manoj Bajpayee And Nawazuddin Siddiqui New Film: ‘गँग्स ऑफ वासोपुर’ नंतर नवाज आणि मनोज पुन्हा एकत्र येणार; पण थिएटरमध्ये नाही तर...

आशुतोष आणि अरुंधतीचे एपिसोडच्या शेवटी खास प्रेमाचे क्षण देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अरुंधतीसोबत आशुतोष पुढील काही दिवस नसल्याने दोघेही भावूक झाले. आपल्या प्रेमाची कबुली हे क्यूट कपल पुन्हा एकदा एकमेकांना देत आहेत. दोघांचाही हा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना एपिसोडच्या अखेरच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com