Khichdi 2 Teaser Out Instagram @zeestudiosofficial
मनोरंजन बातम्या

Khichdi 2 Teaser: टायगर आणि पठाननंतर मोठ्या मिशनवर जाणार पारेख कुटुंब; 'खिचडी 2'चा भन्नाट कॉमेडी टीझर प्रदर्शित

Khichdi 2 Movie: १३ वर्षांनी 'खिचडी 2' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Pooja Dange

Khichdi 2 Teaser Release:

'खिचडी' या मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मालिका संपल्यानंतर या मालिकेतील सर्व कलाकारांचा 'खिचडी' हा चित्रपट २०१० ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता १३ वर्षांनी 'खिचडी 2' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

प्रफुल, हंसा, बाबूजी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. १७ नोव्हेंबरला 'खिचडी 2' प्रदर्शित होईल.

'खिचडी 2'चा टीझर खूपच कॉमेडी आहे. हंसा, बाबूजी, प्रफुल, हिमांशू यांची कॉमेडी तुम्हाला नक्की पोट धरून हसवेल. टीझरची सुरुवातीला टायगर आणि पठानपासून होते.

टीझर सुरू होताच आवाज येतो की, कोणतेही मिशन इम्पॉसिबल नसते. त्याला टायगर किंवा पठान पूर्ण करतात. टीझरमध्ये पारेख परिवार एका मिशनवर जाते. या मिशनदरम्यान हिमांशू गायब होतो. असे टीझरमध्ये दाखविण्यात आले आहे. हंसा आणि प्रफुलचे विचित्र प्रश्न त्यावर बाबूजींची हटके प्रतिक्रिया. विषयापासून भरकटलेला तरीही धमाल विनोदी असा हा टीझर आहे. तर त्या सर्व वेड्यांसोबत आणखी एक अभिनेत्री या चित्रपटामध्ये वेडेपणा करण्यासाठी सज्ज झाली आहे.

टीझर प्रदर्शित होताच व्हायरल झाला आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे कमेंट करून सांगत आहेत. तसेच चित्रपटाची डेट बदलावी अशी सुचना देखील नेटकऱ्यांनी केली आहे. कारण त्याचदरम्यान 'टायगर ३' देखील प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे नुकसान टाळण्यासाठी ही खबदारी घ्यावी असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

सुप्रिया पाठक, राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक जमनादास मजेठियासह कीर्ति कुल्हारी, फराह खान कुंदर, अनंत विधात, प्रतीक गांधी, परेश गनात्रा, किकू शारदा आणि फ्लोरा सैनी हे कलाकार खिचडी २ मध्ये दिसणार आहेत. आतिश कपाडिया यांनी हा चित्रपट लिहिला असून दिग्दर्शन देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT