Shiv Thakare Khatron Ke Khiladi Fees
Shiv Thakare Khatron Ke Khiladi Fees Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare: पठ्ठ्यानं करून दाखवलं... ‘खतरों के खिलाडी १३’साठी शिवनं घेतलं तगडं मानधन, वाचून डोळे पांढरे होतील

Chetan Bodke

Shiv Thakare Khatron Ke Khiladi Fees: बिग बॉसच्या सोळाव्या सीझननंतर शिव ठाकरेच्या अनेक चर्चांना उधाण आले होते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहणारा शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या सीझनमुळे बराच चर्चेत आला आहे. लवकरच खतरों के खिलाडीचा तेरावा सीझन येणार असून कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार यासाठी सर्वच उत्सुक आहेत. या कार्यक्रमात कार्यक्रमात शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी होणार असून त्याने तगडं मानधन स्विकारले आहे.

लवकरच शुटिंगला सुरूवात होणार असून अनेकदा कलाकारांच्या बाबतीत वेगवेगळे तर्क वितर्क ऐकायला मिळाले होते. ‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ चा पहिला स्पर्धक म्हणून शिव ठाकरे याची पुष्टी झाली. अशा परिस्थितीत शिव या सीझनमध्ये तगडी फी स्विकारली असल्याची माहिती मिळत आहे. शिव थोडक्यात ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीपासून थोडक्यात मुकला असून त्याची बरीच निराशा झालेली दिसत होती. ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या सीझनसाठी शिव विचारण्यात आले असून त्याने शो ला होकार देखील दर्शवला.

सर्वात आधी ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सीझनचं विजेतेपद आणि ‘बिग बॉस १६’चं पहिलं उपविजेते पद मिळालेल्या स्पर्धकाच्या मानधनात आता घसघशीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेची लोकप्रिय लक्षात घेत ‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांनी त्याला घसघशीत मानधन दिलं आहे. एका एपिसोडसाठी जवळपास शिवने ५-८ लाख रुपये मानधन स्विकारले.

‘बिग बॉस १६’च्या घरात शिव ठाकरे टॉप- ५ स्पर्धकांपैकी एक स्पर्धक होता. त्याची खेळी रोहित शेट्टी आणि निर्मात्यांच्या पसंतीस उतरली आणि लगेचच त्यांनी त्याला ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या सीझनसाठी ऑफर मिळाली. शिवने बिग बॉसच्या घरात आपल्या उत्कृष्ट खेळीने टास्क पूर्ण केले आहेत. ‘आपला माणूस’ म्हणून ओळख असलेला शिव अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. आता ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये तो कसं खेळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

SCROLL FOR NEXT