Khalapur Irshalwadi Landslide Accident Jui Gadkari Reaction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khalapur Irshalwadi Landslide: ‘माझ्या खूप जवळचा विषय...’ इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट

Khalapur Irshalwadi Landslide Accident Marathi Celebrity Reaction: सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीने भावुक पोस्ट करत इर्शाळ गडावरील एक आठवण सांगितली आहे.

Chetan Bodke

Khalapur Irshalwadi Landslide Accident Jui Gadkari Reaction: रायगड जिल्ह्यातल्या खालापूरनजीक असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. संपूर्ण इर्शाळवाडी गाव या दुर्घटनेमुध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सरु आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे प्रशासन देखील ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसून येत आहे.

या घटनेवर अनेक क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकर देखील या घटनेवर दु:ख व्यक्त करत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीने भावुक पोस्ट करत इर्शाळगडावरील एक आठवण सांगितली आहे.

जुई गडकरी इर्शाळ गडावर तिच्या कुटुंबासोबत गेली होती. त्यावेळचे फोटो जुईने आपल्या पोस्टमध्ये शेअर केले आहेत. जुई गडकरी पोस्टमध्ये म्हणते, “इर्शाळगडावर गेलो तेव्हाच्या काही आठवणी… सकाळपासुन इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची बातमी बघतेय आणि डोकं सुन्नं झालय… तिथल्या आऊच्या हातचा स्वयंपाक अजुनही आठवतोय… एव्हढ्या ऊंचावर असलेली ठाकरवाडी… विज नाही.. मेडिकल, जिवनावश्यक वस्तु असं वरती ठाकरवाडीत काहीच नाही.. तरीही सदैव चेहरा हसरा… कसं काय जमतं त्यांना?”

आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये अभिनेत्री म्हणते, “प्रत्येक वेळी एक ते दिड तास चढुन वर जाणं किती अवघडेय… पण तरीही कसलीही तक्रार नं करता खुप कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं… माझ्या खुप जवळचा विषय आहे ठाकरं आणि ठाकरवाड्या… कितीतरी वाड्यांवर मी फिरलिये… त्यांच्या हातचं चविष्ठं जेवण जेवलिये… बातमी बघुन खुप वाईट वाटलं… सगळे सुखरुप असुदेत.”

खालापूरजवळच्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. त्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० घरं दबली गेली आहेत. रायगडमधील इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर जखमींचाही आकडा वाढण्याची शक्यता आहे. ४८ कुटुंबांची ही वाडी असून यामध्ये २५० पेक्षा जास्त लोकं राहत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT