Ketaki Chitale Saam tv
मनोरंजन बातम्या

केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

ठाणे न्यायालयानं केतकीला सुनावली पोलीस कोठडी

जयश्री मोरे

राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.मुंबई - मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिका केल्या प्रकरणी केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज तिला कोर्टात हजार करण्यात आले होते त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी केतकी चितळे हिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला.

हे देखील पाहा -

केतकीने कोर्टात सांगितलं की, मी पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे. ती पोस्ट माझी नाही आहे. मी ती पोस्ट सोशल मीडियावर कॉपी पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं म्हणजे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने कोर्टात हजार केला.

शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला महागात पडलं आहे. शनिवारी केतकीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे यावेळी केतकी चितळे हीनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तिच्या वतीनं कुणीही वकील कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी नेमण्यात आलेला नव्हता. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अखेर आज युक्तिवादानंतर तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

केतकीवर आज पवई, अमरावती आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी कळवा, धुळे, सिंधुदुर्ग,अकोला,पुणे, पिंपरी-चिंचवड मुंबईतील गोरेगाव इथं गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

Puja Mistakes: पुजा करताना 'या' चुका करु नका, अन्यथा देवी-देवता होतील नाराज

SCROLL FOR NEXT