The Kerala Story 2 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kerala Story 2 Movie Controversy: 'द केरल स्टोरी 2' निर्मात्याला हायकोर्टाचा मोठा दणका; थेट चित्रपटाच्या रिलीजवर घातली बंदी

The Kerala Story 2 Movie Controversy: 'द केरल स्टोरी 2' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच 'द केरल स्टोरी 2' चित्रपटाच्या निर्मात्यांना केरळ उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

Manasvi Choudhary

'द केरल स्टोरी 2' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

उद्या 27 फेब्रुवारीला चित्रपट रिलीज होणार होता मात्र आता न्यायालयाने चित्रपटाला स्थगिती दिली आहे.

'द केरल स्टोरी 2' हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादात अडकला आहे.

The Kerala Story 2 Movie Controversy: 'द केरल स्टोरी 2' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच 'द केरल स्टोरी 2' चित्रपटाच्या निर्मात्यांना केरळ उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. उद्या 27 फेब्रुवारीला चित्रपट रिलीज होणार होता मात्र आता न्यायालयाने चित्रपटाला स्थगिती दिली आहे.

'द केरळ स्टोरी 2' हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादात अडकला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, केरळ राज्यांविषयी अचूक सादरीकरण करण्यात आले आहे. कोर्टामध्ये या चित्रपटाविषयीच्या तीन याचिका दाखल झाल्या आहेत ज्यामध्ये चित्रपटाचे सेन्सर सर्टिफिकेट रद्द करण्याची आणि चित्रपट रिलीज होऊ नये अशी मागणी होत आहे.

न्यायालयाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ला याचिकाकर्त्याच्या याचिकेवर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पुढच्या दोन आठवड्यांमध्ये या प्रकरणावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएफसीचे नवीन आदेश जारी होईपर्यंत, न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे.

याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत चित्रपटाच्या काही भागांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे, ज्यात चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी देखील आहे. याचिका कर्त्यांचे म्हणणे आहे की, 'द केरल स्टोरी 2' हा चित्रपट केरळ राज्याविषयी चुकीचे माहिती सादर करत आहे. यामुळे समाजात जातीय तणाव देखील होऊ शकतो.

'द केरल स्टोरी 2' हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द केरल स्टोरी 2' चा दुसरा भाग आहे. पहिला चित्रपटही वादग्रस्त होता, पण त्यामुळे या चित्रपटाची मोठी कमाई झाली. विपुल अमृतलाल शाह निर्मित 'द केरल स्टोरी 2' चे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले . हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

SCROLL FOR NEXT