Sejal Pawar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळणाऱ्या सेजल पवारवर आधी FIR दाखल, आता KEM कॉलेजकडून मोठी कारवाई

Sejal Pawar: व्हायरल व्हिडिओमुळे वादात सापडलेल्या KEM विद्यार्थिनी सेजल पवारला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर सेलनेही या प्रकरणी FIR दाखल केली आहे.

Shruti Vilas Kadam

Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाबद्दल आक्षेपहार्य कमेंट करणाऱ्या किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस (MBBS) विद्यार्थिनी सेजल पवारवर KEM संस्थेने कठोर कारवाई केली आहे. महाविद्यालय प्रशासनाने तिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या कालावधीत तिला KEM रुग्णालय, सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजचा परिसर आणि वसतिगृहात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, वाद समोर आल्यानंतर सेजल पवारला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेनंतर महाविद्यालयात आलेल्या तिच्या पालकांशी प्रशासनाने बैठकही घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणामुळे तिचे कुटुंब अत्यंत चिंतेत आहे. सेजल पवारने या प्रकरणाबाबत आपल्या कुटुंबीयांची माफीही मागितल्याचे समजते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी संस्थेने पाच सदस्यांची समिती स्थापन केली असून, त्यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवालातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाईल.

महाविद्यालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी सेजल पवारच आहे. प्रशासनाने सांगितले की, व्हिडिओमध्ये तिने केलेले काही दावे 'प्रथमदर्शनी' चुकीचे आणि अस्वीकार्य असल्याचे आढळून आले. या आधारावर, तिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवून तात्पुरती कारवाई करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. या काळात ती नियमित वर्ग, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, महाविद्यालयीन उपक्रम आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांपासून दूर राहील.

हा संपूर्ण वाद नक्की काय आहे?

प्रणित मोरेच्या 'स्टँड-अप कॉमेडी' शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधताना प्रणितने सेजलला विचारले तुम्ही मृतदेहाचा अभ्यास करताना काय मज्जा मस्ती करता त्यावर सेजल म्हणाली आम्ही अनेक वेळा मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट करतो आकार रंग याबद्दल विनोद करतो. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका झाली आणि या प्रकरण एका मोठ्या वादात रूपांतरित झाले. यानंतर महाराष्ट्र सायबर क्राईमने गुन्हा दाखलं केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT