Baipan Bhari Deva Official Teaser
Baipan Bhari Deva Official Teaser  Saam TV
मनोरंजन बातम्या

Baipan Bhari Deva Teaser: अगं बाई अरेच्चानंतर केदार शिंदे म्हणतोय 'बाईपण भारी देवा', 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित होताच नवीन सिनेमाचा टीझर रिलीज

Satish Kengar

Baipan Bhari Deva Teaser: केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. एकीकडे हा सिनेमा रिलीज झाला असताना त्याने आपल्या आगामी चित्रपट 'बाईपण भारी देवा' याचा टीझर रिलीज केला आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. 'बाईपण भारी देवा' हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.  (Latest Entertainment News)

यावर केदार शिंदे म्हणतात की,"आपल्याकडे विविध विषयांवर सिनेमे बनवले जातात पण बायकांच्या मनाचा किंवा भावनांचा विचार क्वचितच केला जातो. तोच विचार मी अगं बाई अरेच्चा करताना केला आणि आता बाईपण भारी देवा मध्ये यातील पुढच्या टप्प्याचा विचार करून, प्रत्येक स्त्रीला तिची कथा बघतेय किंवा ही तर मीच आहे असा फील देणारी ही फिल्म आहे.''

तो म्हणाला की, ''आज माझा चित्रपट महाराष्ट्र शाहीर प्रदर्शित होतोय आणि त्याचबरोबर माझ्या बाईपण भारी देवा या आगामी चित्रपटाचा टीझर ही दाखविण्यात येणार आहे, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. कारण पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकाच वेळी माझ्या दोन वेगवेगळ्या विषयावर बनलेल्या सिनेमांची अनुभूती अनुभवता येईल.''

जिओ स्टुडिओजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की, असं त्याचं म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदी मुंबईत विविध ठिकाणी भेट देणार

Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

Mahadev Betting Case Update: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT