Kaun Banega Crorepati google
मनोरंजन बातम्या

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Kaun Banega Crorepati : ‘कौन बनेगा करोडपती १७’ ला पहिला करोडपती मिळाला आहे. CISF अधिकारी आदित्य कुमारने 1 कोटी जिंकले. अमिताभ बच्चन यांनी खास शैलीत घोषणा करत आनंद साजरा केला.

Sakshi Sunil Jadhav

‘कौन बनेगा करोडपती १७’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये अखेर या सीझनचा पहिला करोडपती मिळाला आहे. उत्तराखंडचा रहिवासी असलेला आणि सध्या गुजरातमध्ये वीज प्रकल्पात कार्यरत असलेल्या आदित्य कुमारने 1 कोटीचा प्रश्न योग्यरीत्या सोडवून इतिहास रचला आहे.

शोच्या निर्मात्यांनी जाहीर केलेल्या ताज्या प्रोमोमध्ये आदित्यला करोडपती बनताना दाखवण्यात आले असून, त्या क्षणी होस्ट अमिताभ बच्चन स्वतःही अभिमानाने भरून गेलेले दिसत आहेत. प्रोमोमध्ये अमिताभ आदित्यला मिठी मारताना म्हणतात की, हा क्षण त्यांच्यासाठीही अविश्वसनीय आहे.

या खास भागात आदित्यने आपला आतापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसोबत शेअर केला. तो म्हणाला की, ''शिक्षण हेच माझ्या यशाचे गमक आहे. एका लहान खोलीत राहून, मित्रांना सोडून, वर्षभर स्वतःला तयारीसाठी झोकून दिल्यामुळेच मी आज इथे पोहोचलो आहे.'' राष्ट्रीय सुरक्षा परीक्षेत आदित्यने भारतात सहावा क्रमांक मिळवला होता आणि सध्या तो CISFमध्ये डेप्युटी कमांडंट म्हणून तैनात आहे.

एपिसोडमध्ये जेव्हा अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीत 1 कोटी जिंकल्याची घोषणा केली, तेव्हा आदित्य आनंद ने भारून गेला. त्याने ताबडतोब अमिताभ बच्चन यांना मिठी मारली आणि हा क्षण स्वतःसाठी अविश्वसनीय असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT