Katrina Kaif Uniqlo Ambassador Saam TV
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Uniqlo Ambassador: आलिया, दीपिकानंतर कतरिना कैफ झाली मोठ्या ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर

Katrina Kaif Movie: कतरिना कैफ 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे.

Pooja Dange

Katrina Kaif as Uniqlo India ambassador:

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ, दीपिका पदुकोण आणि आलिया भट यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांचे नाव कमावले आहे. कतरिना आता जपनी कंपनी 'युनीक्लो'ची ब्रँड अॅम्बेसेडर झाली आहे. कतरिना पहिली भारतीय अभिनेत्री आहे जी या ब्रँडची अॅम्बेसेडर झाली आहे.

दीपिका पदुकोण लुई व्हिटॉन आणि Levi's या आंतरराष्ट्रीय ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. तर आलिया भट देखील काही दिवसांपूर्वी Gucci या ब्रँडची अॅम्बेसेडर झाली आहे. आता कतरिना सुप्रसिद्ध कपड्यांचा ब्रँड 'युनीक्लो'चा नवा चेहरा झाली आहे.

कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर पोस्ट शेअर करत 'युनीक्लो'ची ब्रँड अॅम्बेसेडर झाल्याच्या आनंद व्यक्त केला आहे. तसेच व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, 'युनिक्लो' जॉईन करण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. हा माझा सर्वात आवडता कपड्यांचा ब्रँड आहे. मला या ब्रँडची स्टाईल, साधेपणा आणि एलिगंस खूप आवडतो.'

कतरिना कैफने तिला जपानी संस्कृती आवडत असल्याचे देखील सांगितलं आहे. कतरिना म्हणाली की, टमी 'युनिक्लो'सोबत पार्टनरशिप करून खूप एक्साईटेड आहे. मला जपानी कल्चर आणि जपानी डिझाईन खूप आवडतं. रोज लागणाऱ्या वस्तूंसाठी हा माझा फेव्हरेट ब्रँड होताच. गेल्या अनेक वर्षांपासून मी या ब्रँडच्या इनोव्हेटिव्ह आणि फंक्शनल प्रॉडक्टची स्तुती करत आहे.' (Latest Entertainment News)

कतरिना कैफ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ब्रँडची अॅम्बेसेडर होत आहे असे नाही. कतरिना दुबईची एअरलाईन्स कंपनी 'एतिहाद एअरव्हेज'ची देखील ब्रँड अॅम्बेसेडर आहे. कतरिनाचा स्वतःचा 'Kay ब्युटी' ब्रँड देखील आहे.

कतरिनाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर ती सलमान खानसोबत 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT