Kartik Aaryan's Chandu Champion Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan's Chandu Champion : 'चंदू नहीं चॅम्पियन हूं मैं'... कार्तिकच्या नवीन चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

Kartik Aaryan's New Movie : कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pooja Dange

Kartik Aaryan Share Poster Of His Upcoming Movie : बॉलिवूडमधील तरुणाईची धडकन म्हणून कार्तिक आर्यन ओळखला जातो. कार्तिक आर्यन एकामागोमाग एक हिट चित्रपट देत आहे. नुकताच 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानंतर लगेचच कार्तिकने नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साजिद नाडियालवाला निर्मित 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खानने केलं आहे. लवकरच साजिद नाडियालवाला, कबीर खान आणि कार्तिक आर्यन एकत्र काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट एका खेळाडूवर आधारित आहे. (Latest Entertainment News)

कार्तिक पहिल्यांदाच बायोपिकवर आधारित चित्रपटात दिसणार आहे. याचबरोबर कार्तिक पहिल्यांदाच खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. हॅडसम, क्युट वाटणाऱ्या कार्तिकला एका जिद्दी आणि धाडसी भूमिकेत पाहणं हा एक वेगळाच अनुभव असणार आहे.

कार्तिकने सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन चित्रपटाची घोषणा केली आहे.जून २०२४मध्ये ईद-उल-अझाच्या मुहूर्तावर 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरवर 'चंदू नही... चॅम्पियन हूं मै' असं कॅप्शनही दिलं आहे.

या पोस्टमुळे कार्तिकच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटात चंदू हे पात्र साकारणार आहे.कार्तिक एका कठोर, जिद्दी आणि स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या, मेहनती अशा मुलाचं पात्र साकारणार आहे.

कार्तिक नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत असतो. कार्तिकच्या बॅक टू बॅक हिट चित्रपटांने प्रेक्षकांना मात्र वेड लावले आहे. कार्तिक नुकताच 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटातील कियारा-कार्तिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलाच पल्ला गाठला आहे. कार्तिकच्या एकामागोमाग हिट चित्रपटानंतर नवीन चित्रपटाच्या घोषनने चाहत्यांना आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Street Market Mumbai: मुंबईतील फॅशन स्ट्रीट मार्केट नेमकं कुठं आहे?

बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच टाकली रेड, आरोपी फरार

Bigg Boss 19 : तान्या मित्तलवर सलमान भडकला; अशनूरच्या डोळ्यात आले पाणी, 'वीकेंड का वार'मध्ये नेमकं घडलं काय?

Maharashtra Live News Update : जुन्या मुंबई पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

'सुनेच्या पगारातून सासऱ्याला २० हजार रूपये मिळतील'; उच्च न्यायालयाचा निकाल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT