Kartik Aaryan's First Look From Chandu Champion Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan's First Look : हिरोची भूमिका केल्याचा अभिमान आहे... कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन'मधील First Look आऊट

Chandu Champion First Look : कार्तिक आर्याने त्याच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे.

Pooja Dange

Kartik Aaryan's First Look From Chandu Champion Out : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवानी यांचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट कथा हा चित्रपट २९ जून प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची चर्चा संपत नाही तो कार्तिकने त्याच्या नव्या चित्रपटाची तयारी देखील सुरू केली आहे. कार्तिकच्या आगामी चित्रपटातील अपडेट शेअर केली आहे.

कार्तिक आर्यन 'सत्यप्रेम की कथा'ची क्रेझ संपत नाही तोपर्यंत दुसऱ्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. 'चंदू चॅम्पियन' या आगामी चित्रपटामध्ये कार्तिक दिसणार आहे. या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

कार्तिक आर्यन पोस्ट

कार्तिक आर्यनने त्याच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. इंडियन टीमचे जॅकेट घातलेला कार्तिक आर्यन खूपच वेगळा दिसत आहे. बारीक कापलेलं केस, गाल आत आले आहेत असा कार्तिकचा लूक आहे.

'चंदू चॅम्पियन' मधील लूक शेअर करत कार्तिकने त्याला कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जेव्हा तुमच्या छातीवर INDIA लिहिले असते, तेव्हा ती एक वेगळीच भावना असते. खऱ्या हिरोची भूमिका केल्याचा अभिमान आहे, एक माणूस जो हार मानण्यास नकार देतो.'

कार्तिक आर्यन नेहमीच आपल्याला रोमॅंटिक आणि विनोदी भूमिकेत दिसला आहे. यावेळी कार्तिक आर्यनने स्वतःला चॅलेंज करत वेगळ्या धाटणीची भूमिका करणार आहे. पण चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिक एक बायोपिक साकारणार आहे. एक खेडाळुचा हा बायोपिक असणार आहे. (Latest Entertainment News)

चंदू चॅम्पियन हे एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटमनध्ये अशा खेळाडूची सत्यकथा आहे ज्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. पॅरालिम्पिक चॅम्पियन मुरलीकांत पेटकर यांच्या वास्तविक जीवनातील कथेवर आधारित हा चित्रपट आहे.

हा चित्रपट आधीच लंडनमध्ये फ्लोरवर गेला आहे आणि सहा महिन्यांच्या शेड्यूलमध्ये चित्रित होण्याची अपेक्षा आहे. नुकतेच सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या रूपाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलेल्या कार्तिकने या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात शारीरिक परिवर्तन घडवून आणले आहे आणि लॉस एंजेलिसच्या एका विशेष टीमने त्याला प्रशिक्षण दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT