Kartik Aaryan Spotted Flying Economy Class Saam TV
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan Spotted Flying Economy Class :आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या कार्तिक आर्यननं केला इकॉनॉमी क्लासने प्रवास; Video Viral

Kartik Aaryan Viral Video : कार्तिक विमानातील त्याची सीट शोधतानाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Kartik Aaryan During Satyaprem Ki Katha Promotion : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दोन्ही स्टार सध्या या चित्रपटाच्या प्रोमोशन करण्यात बिजी आहेत.

दरम्यान कार्तिक आर्यनने पुन्हा एकदा त्याच्या डाउन-टू-अर्थ स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. लॅम्बोर्गिनी यूरस कॅप्सूलसारख्या अनेक लक्झरी कारचे कलेक्शन असलेला कार्तिकने चक्क इकॉनॉमी क्लासने प्रवास केला आहे. कार्तिकचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवरील एका पेजने कार्तिकचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक विमानातील त्याची सीट शोधताना दिसत आहे. तर कार्तिकने यावेळी डेनिमसह फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. तो कधी आणि कोणत्या फ्लाइटमध्ये होता दे देखील त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट कळून येत आहे.

बॉलिवूड स्टारची इकॉनॉमीने प्रवास करताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिलमध्ये, कृती सेननने इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केला होता. ती तिच्या सहप्रवाशांशी संवाद साधताना दिसली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी देखील इकॉनॉमीमधून प्रवास केल्याचे व्हिडिओ च्यारलं झाले होते.

कार्तिक आर्यन - कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ट्रेलर या महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये कार्तिक - कियाराच्या रोमँटिक चित्रपटाची झलक दिसली. भूल भुलैया 2 नंतर एका वर्षाने कार्तिक आणि कियारा या ऑन-स्क्रीन जोडीला पुन्हा एकत्र आणणाऱ्या या चित्रपटात ही जोडी एका विवाहित जोडप्याच्या भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

SCROLL FOR NEXT