Kartik Aaryan Holi Celebrate In America Instagram/ @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला आली 'परेदेस मे देस वाली फिलिंग', व्हिडीओ शेअर म्हणाला...

कार्तिक आर्यन होळी सेलिब्रेशनसाठी थेट परदेशात गेला आहे.

Chetan Bodke

Kartik Aaryan Holi Celebrate In America: 'शेहजादा' स्टार कार्तिक आर्यन नुकताच होळी फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत पोहोचला आहे. अमेरिकेतील डॅलसमध्ये कार्तिकला त्याच्या चाहत्यांकडून अफाट प्रेम मिळाले आहे. त्याला पाहताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्या नावाचा आरडाओरडा केला.

त्याचा 'शेहजादा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करु शकलेला नाही. कार्तिक आर्यन चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत होळी साजरी करण्यासाठी कारच्या छतावर चढत परदेशी चाहत्यांसोबत होळी साजरी केली.

कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अमेरिकेतील डॅलसमधील होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की अभिनेत्यासोबत होळी साजरी करण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. गर्दी पाहून कार्तिक आर्यन आपल्या कारमधून बाहेर आला आणि गाडीच्या छतावर चढला.

यावेळी त्याच्या चाहत्यांनी उडवलेला रंग त्याच्या कपड्यावर दिसून येत आहे. परदेशातही कार्तिक आर्यनचा चाहतावर्ग किती आहे, यावरुन स्पष्ट होतं.

व्हिडिओ शेअर करत कार्तिक आर्यनने चाहत्यांचे आभार मानत लिहिले, 'मी परदेशात होळी सण साजरा करण्यासाठी पहिल्यांदाच आलो आहे. मला परदेशात चाहत्यांचं मिळालेलं प्रेम पाहून विश्वास बसत नाही. इतक्या अभूतपुर्व दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे खूप खूप आभार. ही होळी माझ्या मनात एक अढळ स्थान निर्माण करुन जाईल.'

कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर चाहते म्हणतात, 'अमेरिकेच्या नागरिकांनी अखेर मला बोलवलेच, माझी यावर्षाची होळी उत्तम केल्याबद्दल धन्यवाद.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'कदाचित आर्यन भविष्यातील शाहरुख खान असेल' दुसऱ्या एका चाहत्याने 'कार्तिक आर्यनला तुझा अभिमान आहे, आम्ही नेहमीच तुझ्यावर असाच प्रेमाचा वर्षाव करत राहु', अशी प्रतिक्रिया दिली.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, 'शेहजादा' नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. पण त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करु शकलेला नाही. कार्तिक आर्यन सध्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यानंतर तो 'भूल भुलैया 3'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल. कार्तिकने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शनिवारवाड्यात आंदोलनावेळी रुपाली पाटील यांना आली चक्कर

Banjara Community : बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक; एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

बघा, आकाशात उडणारी कार; शर्यतीचा थरारही रंगला | VIDEO

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

Maharashtrachi Hasyajatra: 'सगळं फिरलो, पण आपलं गावच बरं! हास्यजत्रेच्या मंचावर ओंकार भोजनेचा कमबॅक

SCROLL FOR NEXT