Kaaliya Movie: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा आजवरचा प्रवास अनेक सुपरहिट चित्रपटांनी गाजला आहे. 'भूल भुलैया २' आणि 'भूल भुलैया ३' या चित्रपटांमधून त्याने हॉरर-कॉमेडीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता कार्तिक पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, 'कालिया' (Kaaliya) या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. पौराणिक कथा आणि मॉन्स्टर-थ्रिलरचा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
'कालिया' हा पौराणिक कथेवर आधारित मॉन्स्टर-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप मोदी करणार आहेत, तर धर्मा प्रोडक्शन्स चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या भूमिकेबद्दल अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्याचा सामना एका भयानक राक्षसाशी होणार आहे. यापूर्वी कार्तिकने 'भूल भुलैया'च्या माध्यमातून हॉरर-कॉमेडीमध्ये काम केले आहे. तसेच तो 'नागझिला' या फँटसी-कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. मात्र, 'कालिया'मधून तो एका थरारक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.
'कालिया'चा २ मिनिटे ३१ सेकंदांचा टीझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. टीझरची सुरुवात एका आईकडून होते. ती आपल्या लहान मुलाला झोपवण्यासाठी एक प्राचीन गोष्ट सांगते. अनेक शतकांपूर्वी 'कालिया' नावाचा भयानक प्राणी पवित्र नदीत राहत होता. भगवान श्रीकृष्णाने त्याचा पराभव करून त्याला नदीतून हाकलून दिले होते, अशी कथा ती मुलाला सांगते. मात्र, पुढे टीझरमध्ये या राक्षसाची भयानक झलक पाहायला मिळते. नदीतून बाहेर येणारा हा प्राणी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर एका कुत्र्याची शिकार करतो. विशेष म्हणजे, श्रीकृष्णाने ज्याला दूर केले होते, त्याला आता मानवांनीच पुन्हा परत आणल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.
या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अदर पूनावाला, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा, मारिजके डिसोझा आणि कार्तिक आर्यन करत आहेत. संदीप मोदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी यापूर्वी 'द नाईट मॅनेजर' आणि 'आर्या' यांसारख्या लोकप्रिय वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. 'कालिया' हा त्यांचा चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला हिंदी चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट ५ मे २०२८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.