Satyaprem Ki Katha box office collection Day 2 : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट गुरुवारी २९ जूनला प्रदर्शित झाला. बकरी ईदची सुट्टी लक्षात घेऊन निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित केला. चित्रपटाविषयी पहिल्या दिवशी विविध प्रतिक्रिया आला. पण चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून कियारा-कार्तिकची जोडी प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे.
आदिपुरुष चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवसपासूनच कमी होत गेलं. तर 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा करायला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ९ कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले. तर तरण आदर्श यांनी दिलेल्या प्रेडिक्शननुसार चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन कमी झाले आहे.
'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या बजेट विषयी बोलायचे झाले तर चित्रपट बनविण्यासाठी ६५ कोटी आणि प्रमोशन आणि मार्केटिंगमध्ये १० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचा एकूण खर्च ७५ कोटी आहे. चित्रपटाचे कलेक्शन पाहता चित्रपट या यशस्वी होईल. (Latest Entertainment Update)
सत्यप्रेम की कथा चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. तरण आदर्श यांनी ट्विट करत चित्रपटाच्या कलेक्शनविषयीची माहिती दिले आहे. तरण आदर्श ट्विटमध्ये लिहिले आहे, ' शुक्रवार हा चकामकाजाचा दिवस होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सत्यप्रेम की कथाच्या कमाईवर परिणाम झाला… संध्याकाळच्या शोला मात्र देशभरात चांगली गती दिसली... गुरुवारी ९.२५ कोटी, शुक्रवारी ७ कोटीचे कलेक्शन केलेल्या या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 16.25 कोटी झाले आहे.
#KartikAaryan - #KiaraAdvani स्टारर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये सकारत्मक पाहायला मिळत आहे. 3 आणि 4 व्या दिवशी चित्रपटाची डबल कमाई करेल…'
'सत्यप्रेम की कथा' चित्रपटात कार्तिक-कियारा प्रमुख भूमिकेत आहे. कार्तिक हा सत्यप्रेम तर कियारा कथा हे पात्र साकारत आहे. याआधी हे दोघेही 'भूलभूल्लैया २'मधून एकत्र झळकले होते.
कियारा कार्तिकच्या या लव्हस्टोरीला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहे. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाल यांनी केली आहे. तर चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत आहे.
'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे चित्रपट दिग्दर्शक समीर विद्वंस यांनी केले आहे. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट असून चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे त्याचे भरपूर कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.