Satyaprem Ki Katha Box Office Collection  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Satyaprem Ki Katha Box Office Collection : कार्तिक - कियाराच्या क्रेज ; बॉक्स ऑफिसवर 'सत्यप्रेम की कथा'च्या कलेक्शनमध्ये वाढ

Satyaprem Ki Katha Collection: 'सत्यप्रेम की कथा'च्या तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन तसेच या सिनेमासाठी सोमवार किती महत्त्वाचा आहे चला जाणून घेऊया.

Pooja Dange

Satyaprem Ki Katha 3rd Day Box Office Collection : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' 29 जून 2023 (गुरुवार) रोजी प्रदर्शित झाला. समीर विद्वांस दिग्दर्शित, हा चित्रपट शुक्रवार ऐवजी गुरुवारी प्रदर्शित झाला. कारण त्या दिवशी देशभरात बकरी ईदची सुट्टी होती. या दिवशी चित्रपट प्रदर्शित केल्याने बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढेल असे निर्मात्यांना वाटत होते.

पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत 24.32% ची घसरण झाली. शनिवारी (1 जुलै) निर्मात्यांना थोडा दिलासा मिळाला. कारण वीकएंडच्या पहिल्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. 'सत्यप्रेम की कथा'च्या तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन तसेच या सिनेमासाठी सोमवार किती महत्त्वाचा आहे चला जाणून घेऊया. (Entertainment Marathi News)

साजिद नाडियादवाला आणि नमह पिक्चर्सच्या सत्यप्रेम की कथाने पहिल्या दिवशी (गुरुवारी) ९.२५ कोटी कमाई केली. चालू दिवस असल्याने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमाईत घट झाली आणि 7 कोटींचे कलेक्शन झाले. काल तिसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवार चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याची कमाई 10.10 कोटी होती. कमाईत 44.28% ची वाढ झाली आहे.

कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाबद्दल थोडेसे जाणून घेऊया. चित्रपटाचे बजेट ६५ कोटी रुपये आहे. हिंदी व्यतिरिक्त, तामिळ, तेलुगू आणि पंजाबी भाषांमध्ये 2 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. आतापर्यंत (तीन दिवस) चित्रपटाची एकूण कमाई 26.35 कोटी रुपये झाली आहे.

विश्लेषकाच्या मते, शनिवारी कार्तिक आणि कियाराच्या चित्रपटाला ज्याप्रकारे चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे रविवारी चांगली कमाई होण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाचे कलेक्शन 12 ते 13 कोटी असू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT