Kartik Aryan Saam Tv
मनोरंजन बातम्या

कार्तिक आर्यनने रिलीज डेटसह 'शेहजादा'चा फर्स्ट लुक केला शेअर

कार्तिकचा फर्स्ट लुक पाहून चाहते पुन्हा एकदा 'हिट है बॉस' म्हणत आहेत.

Shivani Tichkule

मुंबई - कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) 'भूल भुलैया 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. चित्रपटाने दमदार कलेक्शन केले आणि चित्रपट सुपरहिट ठरला. लोकांना त्याचा चित्रपट इतका आवडला की रिलीजच्या पाचव्या आठवड्यापर्यंत चित्रपटाची क्रेझ दिसून आली. आता कार्तिक त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे नाव 'शेहजादा' आहे. कार्तिकने नुकतीच या चित्रपटाच्या रिलीज डेटसह त्याचा फर्स्ट लुक शेअर केला आहे, जो पाहून चाहते पुन्हा एकदा 'हिट है बॉस' म्हणत आहेत.

हे देखील पाहा -

कार्तिक आर्यन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि अनेकदा त्याच्या फोटो आणि व्हिडिओद्वारे चाहत्यांना वेड लावतो. अलीकडेच, त्याने त्याच्या आगामी 'शेहजादा' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर केला आणि चाहत्यांना चित्रपटाच्या डेटच्या तारखेबद्दल देखील अपडेट केले आहे. हा चित्रपट या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार होता, मात्र आता या चित्रपटाची तारीख बदलण्यात आली आहे.

आता हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या पहिल्या लूकमध्ये, कार्तिक वेगाने धावताना दिसत आहे. चित्रासह, त्याने त्याच्या ट्विटमध्ये क्रिती सेननसह इतरांना टॅग केले आहे.

कार्तिकचा फोटो पाहून 'हिट है बॉस' अशा कमेंट चाहत्यांच्या आल्या आहेत. चाहत्यांना कार्तिकचा लूक खूप आवडला आहे. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याने काही चाहते निराश झाले आहेत. कार्तिकच्या या चित्रपटासाठी आता काही महिने आणखी वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT