Kartik Aaryan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan New Movie : कार्तिक आर्यनकडे आणखी एक चित्रपट, आता मोठ्या पडद्यावर करणार 'आशिकी'

कार्तिक आर्यनकडे सध्या अनेक चित्रपट आहेत आणि आता त्याने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड जगतात सध्या अभिनेता कार्तिक आर्यनचा(Kartik Aaryan) बोलबाला आहे. त्याच्या 'भूल भुलैया २' या चित्रपट सुपरहिट झाल्याचे पाहून कार्तिकला बॉलिवूडचे आशास्थान मानले जात आहे. या अभिनेत्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत आणि आता त्याने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अलीकडेच कार्तिक आर्यनने त्याच्या(Social Media) सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांसाठी ही गुड न्यूज शेअर केली आहे. कार्तिकच्या या घोषणेनंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कार्तिकच्या या घोषणेनंतर चाहते त्याच्या 'या' आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कार्तिक आर्यनने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आगामी 'आशिकी ३' या चित्रपटाबद्दल सरप्राईज चाहत्यांना दिले आहे. या चित्रपटाची घोषणा करताना कार्तिकने लिहिले, 'अब तेरे बिन जी लेंगे हम...जहर जिंदगी का जी लेंगे हम...' हा दिग्दर्शक बासू दा सोबतचा माझा पहिला चित्रपट आहे.' 'आशिकी'चे आतापर्यंत दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पहिला चित्रपट १९९० साली आला होता आणि दुसरा चित्रपट २०१३ साली आला होता आणि आता लवकरच त्याचा तिसरा भाग येणार आहे.

कार्तिक आर्यनचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. अलीकडेच त्याने माहिती दिली होती की तो त्याच्या 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. याशिवाय तो 'शेहजादा' आणि 'फ्रेडी' या चित्रपटातही दिसणार आहे. अभिनेत्री आलिया एफ 'फ्रेडी' या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

Maharashtra Live News Update : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

SCROLL FOR NEXT