Kareena Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor and Saif Ali Khan Photo: करीनाचं नवऱ्याचं कौतुक काही संपेना; सैफचा फोटो शेअर करत म्हणाली...

Kareena Kapoor Share Saif Photo: करीनाने नुकताच नवरा सैफ अली खानचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Pooja Dange

Kareena Kapoor Showers Love On Saif Ali Khan: करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. त्यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडसह सर्वांचं माहीत आहे. बेबो ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तर नवऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

करीना कपूर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. करीना कपूरचे सोशल मीडियावर कोटींच्या घरात फॉलोवर्स आहेत. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. विषेश म्हणजे ती तिच्या नवऱ्याचे आणि मुलांचे देखील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

करीनाने नुकताच नवरा सैफ अली खानचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत सैफने गुलाबी रंगाचं टीशर्ट, काळी पॅन्ट, पांढरे शुज आणि सनग्लासेस घातले आहेत. सैफ फोटोत खूप हॅंडसम दिसत आहे.

बेबोने या फोटोवर तिच्या आयकॉनिक चित्रपट 'कभी खुशी कभी गम' मधील आयकॉनिक डायलॉग 'गुड लूक्स, गुड लूक्स आणि गुड लूक्स' लिहित सैफचं कौतुक केलं आहे. करीना कधीच नवऱ्याचं कौतुक करायला मागे नसते. (Latest Entertainment News)

Kareena Kapoor Share Saif Photo

दरम्यान करीनाने तिच्या 'द क्रू' चित्रपटाबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, ती 'द क्रू' बद्दल खूप उत्सुक आहे. तब्बू आणि क्रितीसोबत काम करताना तिला खूप आनंद झाला आहे. करीना म्हणाली की तिची बहीण आणि तब्बू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, त्यामुळे ती खूप एक्साइटेड आहे. कारण तिचा तब्बूसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती तिच्या नवीन चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तिच्यासोबत तबू आणि क्रिती सेनन दिसणार आहे. तर सैफ अली खानचा 'आदिपुरुष' हा बहुचर्चित चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफने रावणाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT